कुटुंबाच्या सर्व जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळून घराबाहेर पडणाऱ्या तिचा दिवस सूर्य उगवायच्या आधी सुरू होऊन रात्री उशिरा संपतो. घराबाहेर पडणाऱ्या महिलांना क्षणोक्षणी आव्हानांचा सामना करावा लागतो. उपनगरात राहणाऱ्या नोकरदार महिलांपुढे लोकलमधील गर्दीचे चक्रव्यूह भेदणे हे फार मोठे आव्हान असते. मात्र तो त्रासही मैत्रिणींचा अड्डा जमवून त्या सुसह्य़ करतात. अशाप्रकारे सदैव अष्टावधानी राहून अनेक आघाडय़ांवर यशस्वी तोंड देणाऱ्या महिलांच्या कर्तृत्वाला सलाम करावा या हेतूने सध्या जगभरात जागतिक महिला दिन साजरा केला जातो. ठाणे परिसरातही ८ मार्चचे औचित्य साधून खास महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महिला दिनानिमित्त टिपलेल्या या भावमुद्रा..