लग्न जुळविणाऱ्या संकेतस्थळावरुन लग्नाची मागणी घालून एका भामटय़ाने डोंबिवलीतील ४५ वर्षीय महिलेची तब्बल एक कोटी २२ लाख २० हजारांची फसवणूक केल्याची घटना उ़घडकीस आली आहे. अमेरिकास्थित या भामटय़ाने विविध कारणे सांगून ३७ जणांच्या नावाने तिच्याकडून पैसे गोळा केल्याची बाब पुढे आली असून याप्रकरणी बुधवारी रात्री रामनगर पोलिस ठाण्यात तब्बल ३७ जणांविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डोंबिवली पूर्वेतील आयरे रोड परिसरात राहणाऱ्या ४५ वर्षीय महिलेने ही तक्रार कागदोपत्री पुराव्यासह दाखल केली आहे.