ठाण्यातील मंदिर व्यवस्थापनाकडून समानतेचा नवा पायंडा
शनिशिंगणापूर येथे शनिदेवाच्या चौथऱ्यावर जाऊन महिलेने दर्शन घेतल्यानंतर राज्यभरात नवीन चर्चेने तोंड उघडले असतानाच ठाण्यातील मध्यवर्ती कारागृहालगतच्या प्रसिद्ध शनिमंदिराचा गाभारा मात्र महिलांसाठी खुला आहे. केवळ गाभाऱ्यात प्रवेश हे या मंदिराचे वैशिष्टय़ नाही, तर अभिषेक आणि अन्य धार्मिक विधी करण्याची व्यवस्थाही येथे महिलांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. ठाण्यातील वर्तकनगर येथील साईबाबा प्रतिष्ठानमधील शनी मंदिराच्या गाभाऱ्यातही यासंबंधीच्या रूढी मोडीत काढून महिलांना प्रवेश दिला जातो. असे काही अपवाद वगळले तरी शहरातील अन्य काही मंदिरांमध्ये मात्र महिलांना प्रवेश आहे, पण गाभाऱ्यात नाही असे चित्र दिसून आले. ठाणे परिसरात अनेक छोटी-मोठी शनी मंदिरे आहेत. यापैकी बहुतांश मंदिरांच्या गाभाऱ्यात महिलांना प्रवेश नाकारला जातो. तर शनिदेवाचा अभिषेक करण्यासही महिलांना मज्जाव करण्यात आला आहे. शनिशिंगणापूर येथील ही प्रथा ठाण्यातील मंदिरातही काटेकोरपणे पाळली जाते. मात्र या जुन्या रूढीला छेद देण्याचे काम ठाण्यातील मध्यवर्ती कारागृह परिसरातील शनिदेव मंदिराच्या व्यवस्थापनाने केले आहे. गेल्या बऱ्याच वर्षांपासून या शनी मंदिराच्या गाभाऱ्यात महिलांना प्रवेश देण्यात येतो. शिवाय शनिदेवाचा अभिषेक करण्याची परवानगीही त्यांना असते. कोपिनेश्वर मंदिर ट्रस्ट यांच्यामार्फत या मंदिराचा कारभार पाहिला जातो. या मंदिरातील शनिदेवाच्या गाभाऱ्यात महिलांना प्रवेश देऊन मंदिराच्या समितीने धार्मिक विधीतसुद्धा स्त्री-पुरुष समानतेचा आदर्श ठेवला आहे. याशिवाय वर्तकनगर येथील साईबाबा प्रतिष्ठानच्या शनिदेव मंदिराच्या गाभाऱ्यातही प्रवेश देण्यात येतो.

महिलाच टाळतात अभिषेक’
प्राचीन काळात महिलांना धार्मिक कार्यात बंदी हा प्रकार नव्हता. कालांतराने हे बंदी पर्व सुरू झाले, मात्र आता काळानुसार प्रत्येकाचे विचार बदलले आहेत. बदलत्या काळानुसार ठाणे कारागृह शनी मंदिरात सुरुवातीपासून मूर्तीवर अभिषेकास परवानगी देण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला. या मंदिरात शनी जयंतीच्या दिवशी लघुरुद्र हा धार्मिक विधी महिलांच्या हस्ते केला जातो. व्यवस्थापनाने अभिषेक करण्यासाठीसुद्धा परवानगी दिली. मात्र बहुतांश महिला स्वत:च गाभाऱ्यात येणे किंवा अभिषेक करणे टाळतात, असे कोपिनेश्वर मंदिर समितीचे अध्यक्ष सुहास बाक्रे यांनी सांगितले.

sassoon hospital marathi news
ऑपरेशन ‘ससून’! अधिष्ठात्यांना डावलून थेट आयुक्तांनी हाती घेतली सूत्रे
Girls sexually assaulted by bakery owner in Nalasopara
नालासोपार्‍यात बेकरीचालकाकडून लहान मुलींवर लैंगिक अत्याचार, आतापर्यंत ४ पीडितांच्या तक्रारी
Nagpur MIDC police arrested the youth who molested the girl crime news
विवाहितेच्या अंगावर चिठ्ठी फेकली, पुढे झाले असे की…
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !