News Flash

महिला पोलीस मारहाणप्रकरण जलदगती न्यायालयात

माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांची माहिती

माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांची माहिती
ठाण्यातील महिला वाहतूक पोलीस मारहाण प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली असून हे प्रकरण जलदगती न्यायालयापुढे चालविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी मंगळवारी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना दिली. तसेच या प्रकरणासाठी विशेष सरकारी वकील नेमण्याची व्यवस्था आणि सुमोटो याचिका दाखल करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
ठाण्यातील शिवसेनेचा शाखाप्रमुख शशिकांत कलगुडे याने वाहतूक शाखेतील एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला भरदिवसा रस्त्यामध्ये मारहाण केली होती. या घटनेच्या पाश्र्वभूमीवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी मंगळवारी ठाणे वाहतूक शाखेच्या कार्यालयाला भेट दिली. या भेटीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महिला पोलीस मारहाणाची घटना दुदैवी असून हा सर्व प्रकार क्लेशदायक आणि संतापजनक आहे. यामुळे या घटनेची आयोगाने गंभीर दखल घेतली आहे, असे विजया राहटकर यांनी सांगितले. तसेच महिला पोलीसच नव्हे तर अन्य महिलांसोबतही असे प्रकार घडू नयेत, असेही त्यांनी सांगितले. ठाणे पोलिसांकडून तपास योग्य रितीने सुरू आहे. तसेच पोलिसांकडून लवकरच न्यायालयात याप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 2, 2016 12:20 am

Web Title: women police assaulted case in fast track court
Next Stories
1 लोकलमधून पडून विद्यार्थिनीचा मृत्यू
2 हत्याकांडाचे गूढच!
3 वाहनावरील झेंडा पाहूनच भांडणाचा अंदाज..
Just Now!
X