इंडियन मेडिकल असोसिएशन कल्याणतर्फे शहर परिसरातील डॉक्टरांसाठी वैद्यकीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ५ आणि ६ डिसेंबर रोजी आचार्य अत्रे सभागृहात ही कार्यशाळा पार पडली. सुमारे एक हजार डॉक्टर्स उपस्थित होते. ५ डिसेंबर रोजी लहान मुलांचे विविध आजार आणि हृदयविकाराशी संबंधित आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन शिबिरात करण्यात आले. उपस्थित तज्ज्ञांना डॉक्टरांनी प्रश्न विचारून शंकांचे निरसन केले. रविवारी डॉ. अशोक महाशूर यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. तसेच डॉक्टर प्रदीप बालिया यांना त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील अथक सेवेबद्दल आय. एम. ए. अचिव्हमेंट पुरस्काराने शिबिरामध्ये गौरवण्यात आले.