सायली रावराणे

लांबपल्ल्याच्या गाडय़ा फलाट ६-७वरून; प्रतीक्षालय मात्र फलाट दोनवर; आडबाजूला असल्याने प्रवासी अनभिज्ञ

Troubled by unruly rickshaw driver at Panvel station Suffering continues despite taking action
बेशिस्त रिक्षाचालकांचा पनवेल स्थानकात अडसर; कारवाई करूनही मुजोरी कायम, प्रवाशांचे हाल
Sakkardara flyover, Nagpur,
नागपूर : भरधाव वाहनांसह अपघाताच्या भीतीचे सावट, सक्करदरा उड्डाण पुलावर मागील वर्षात १३ अपघात
navi mumbai, Valve Repair, Traffic Congestion, footpath close, Pedestrian Woes, kopar khairane, teen taki area, marathi news,
व्हॉल्व दुरुस्तीच्या कामामुळे पादचाऱ्यांचे हाल; कोपरखैरणेत तीन टाकी परिसरात पदपथ बंद
dombivli ganesh nagar marathi news
डोंबिवलीतील गणेशनगरमधील रस्ता काँक्रीटीकरणासाठी बंद, नवापाड्यात जाण्यासाठी प्रवाशांचा वळसा घेऊन प्रवास

मध्य रेल्वेवरील सर्वाधिक गर्दीचे स्थानक असलेल्या ठाणे स्थानकातून मार्गक्रमण करणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाडय़ा आणि प्रवासी यांची संख्या वाढत असताना अशा प्रवाशांसाठीचे प्रतीक्षालय मात्र मोकळे पडून आहे. लांब पल्ल्याच्या गाडय़ा स्थानकातील सहा आणि सात या फलाटांवरून प्रामुख्याने रवाना होत असताना प्रवाशांसाठी प्रतीक्षालय मात्र फलाट क्रमांक दोनवर उभारण्यात आले आहे. याबाबत अनेक प्रवाशांना कल्पनाच नसल्याने तेथे सहसा कुणीच फिरकत नाही, असे चित्र आहे.

ठाणे स्थानकात अनेक लांब पल्ल्याच्या गाडय़ांना थांबा देण्यात आला आहे. त्यामुळे ठाणे शहरासह आसपासच्या परिसरातील प्रवाशांना कल्याण, दादर किंवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत करावी लागणारी दमछाक टळली आहे. ठाणेच नव्हे तर नवी मुंबई तसेच मुलुंड आणि आसपासच्या भागांतील प्रवासीही लांब पल्ल्याची गाडी पकडण्यासाठी ठाणे स्थानकाला प्राधान्य देतात. अशा प्रवाशांच्या गर्दीने स्थानकातील फलाट क्रमांक सहा आणि सात नेहमीच गजबजलेले असतात. या फलाटांवर ताटकळत राहणाऱ्या प्रवाशांसाठी प्रतीक्षालय मात्र फलाट क्रमांक दोनवर उभारण्यात आले आहे. गाडी येण्याच्या फलाटावरून दोन क्रमांकाच्या फलाटावर सामान घेऊन जाण्याची दगदग टाळण्यासाठी प्रवाशी या प्रतीक्षालयाकडे फिरकतच नाहीत. त्यामुळे प्रवाशांच्या सुविधेसाठी उभारण्यात आलेले प्रतीक्षालय सुने सुने असल्याचे दिसून येते.

दरम्यान, लांब पल्ल्याच्या गाडय़ा ज्या फलाटांवर थांबतात तेथे प्रतीक्षालय उभारण्यासाठी पुरेशी जागा नाही, असा दावा रेल्वे प्रशासनाकडून केला जात आहे. असे असले तरी सद्य:स्थितीत उपलब्ध असलेल्या प्रतीक्षालयाचा वापर अधिकाधिक प्रवाशांकडून केला जावा यासाठी रेल्वे प्रशासनाकडून फारसे प्रयत्न होताना दिसत नाहीत, अशी माहिती रेल्वे प्रवाशी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

ठाणे स्थानकात लांब पल्ल्याच्या गाडय़ांसाठी ज्या प्रमाणात प्रवासी आहेत त्या तुलनेत प्रतीक्षालय फारच अपुरे आहे. पुन्हा जे आहे ते एका कोपऱ्यात असल्याने फलाट क्रमांक दोन ते सहा, सात अशी पायपीट करणे प्रवासी टाळतात. जागतिक दर्जाचे स्थानक करण्याऐवजी मूलभूत सुविधा कशा देता येतील याकडे रेल्वे प्रशासनाने लक्ष द्यावे.    – नंदकुमार देशमुख, रेल्वे प्रवासी संघटना