News Flash

२४ तासांत  ४ जण बुडाले

पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने तेजस आणि ध्रुव हे दोघेही बुडाले.

प्रतिनिधिक छायाचित्र

ठाणे : येऊर येथील नील तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी सकाळी तेजस चोरगे (१७) याचाही याच तलावात बुडून मृत्यू झाला. तर ध्रुव कुळे (१७) याचा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून शोध सुरू आहे. या घटनेनंतर येऊर येथील वन अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने या ठिकाणी गस्त वाढवली आहे.

वर्तकनगर भागात राहणारे तेजस आणि ध्रुव हे दोघे त्यांच्या पाच मित्रांसोबत सोमवारी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास नील तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने तेजस आणि ध्रुव हे दोघेही बुडाले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तेजस आणि ध्रुव यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. दुपारी ३ वाजेच्या सुमारास पथकाला तेजसचा मृतदेह आढळून आला. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. तर ध्रुवचा शोध सायंकाळी उशिरापर्यंत लागला नव्हता. रविवारी याच तलावात सेंट्रल मैदान येथील पोलीस वसाहतीमध्ये राहणारा प्रसाद पावसकर (१६) आणि राबोडी भागात राहणाऱ्या जुबेर सय्यद (२१) याचा बुडून मृत्यू झाला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 22, 2021 12:47 am

Web Title: yeoor in the nile lake 4 drowned in 24 hours akp 94
Next Stories
1 कर्करोग रुग्णालयाचा मार्ग मोकळा
2 निर्बंध हटताच बेफिकिरीमुळे गर्दी
3 ‘स्मार्ट सिटी’च्या निधीत भ्रष्टाचार?
Just Now!
X