अंबरनाथ येथील शिवमंदिर यात्रेवरुन परतत असताना रेल्वेतून पडून जखमी झालेल्या देव पवार या तरूणाचा मृत्यु झाला आहे.
महाशिवरात्रीच्या यात्रेवरून परतत असताना देव रेल्वेतून पडला, मात्र अंधार असल्याने त्याला तात्काळ शोधण्यास अडथळे आले. मंगळवारी पोलीस आणि कुटुंबीयांनी शोध घेतला असता रेल्वे रुळांच्या झुडपात देव जखमी अवस्थेत आढळून आला. त्याला तात्काळ अंबरनाथ येथील एका रुग्णालयात दखल केले. तिथून पुढील उपचारांसाठी त्याला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले असता उपचरादरम्यान त्याचा मृत्यु झाला. गेल्या पंधरा दिवसातील रेल्वे अपघातातीत ही तिसरी घटना असल्याने प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे.