News Flash

सिगारेटच्या वादातून तरुणाची हत्या

कॅनेट रोझारियो (६४) याच्याशी सिगारेट पिण्यावरून वाद झाला.

वसई : इस्टरची पार्टी साजरी करायला गेलेल्या एका तरुणाला सिगारेटच्या वादातून झालेल्या भांडणातून आपला जीव गमवावा लागला आहे. मंगळवारी मध्यरात्री नायगाव येथे ही घटना घडली.

चार्मन हेलेस (३६) ही महिला दिनेश पाटील (३०) याच्यासोबत नायगाव येथे राहत होती. मंगळवारी रात्री हे दोघे इस्टरनिमित्त आयोजित पार्टी करण्यासाठी नायगावच्या विजय पार्क येथील बन्क हाऊसमध्ये आपल्या नातेवाईकांकडे गेले होते. रात्री उशीरा दिनेश पाटील याचा

कॅनेट रोझारियो (६४) याच्याशी सिगारेट पिण्यावरून वाद झाला. त्या वादाचे पर्यवसान भांडणात झाले आणि रोझारियो याने स्वयंपाकघरातील चाकू आणून दिनेशवर वार केले. त्यात दिनेशचा मृत्यू झाला. माणिकपूर पोलिसांनी या प्रकरणी कॅनेट रोझारियो याला हत्येच्या आरोपाखाली अटक केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2020 12:57 am

Web Title: young man murdered over cigarette dispute zws 70
Next Stories
1 Coronavirus : चाचणीला चारचाकीतूनच या!
2 Coronavirus Outbreak : दोन पोलीस ठाण्यांतील ६० कर्मचाऱ्यांचे विलगीकरण
3 ऐन हंगामात कृषी पर्यटन कचाटय़ात
Just Now!
X