व्यायामशाळेत नोंदणी करण्यापूर्वी कार्डिओग्राम काढण्याचा डॉक्टरांचा सल्ला

वसईतील एका ३०वर्षीय तरुणीचा व्यायाम करताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपूर्वी नाशिकमधील एका १८ वर्षीय मुलाला अशाच प्रकारे व्यायाम करताना हृदयविकाराच्या झटका आला होता आणि यात त्याचा मृत्यू झाला होता. गेल्या वर्षी वसईतील एका खेळाडूचा पोहण्याचा सराव करताना मृत्यू ओढवला होता.

13 year old school boy dies after drowning in private swimming pool
पुणे: खासगी जलतरण तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू
Ram Navami, High Court, State Govt,
रामनवमीला खबरदारी घ्या! उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश
Nashik, Fraud, developing place,
नाशिक : जागा विकसित करण्याच्या बहाण्याने फसवणूक, सात जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
Bail
अयोग्य स्पर्श केल्याने महिलेकडून एकाची हत्या; तीन वर्षांचा कारावास भोगल्यानंतर कोर्ट म्हणतं, “स्वसंरक्षणार्थ…”

जेनिडा काव्‍‌र्हालो ही ३० वर्षीय तरुणी वसईतील मधुबन हाइट्समध्ये राहत होती. शारीरिक फिटनेससाठी तिने घराजवळील एव्हरशाइन व्यायामशाळेत नाव नोंदवले होते. मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास ती व्यायामशाळेत गेली. तेथे व्यायाम करीत असताना तिला अस्वस्थ वाटू लागले आणि ती जमिनीवर कोसळली. त्या वेळी तिला हृदयविकाराचा झटका आल्याचे निदान डॉक्टरांनी केले आहे.

सध्या धूम्रपान, अवेळी खाणे, जंक फूडचे सेवन, अपुरी झोप, व्यायामाचा अभाव यामुळे तरुणांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण वाढत आहे. या कारणांचा एकत्रित परिणाम व्यायाम करताना होत असतो. त्यामुळे व्यायामाची सुरुवात करणाऱ्या तरुणांनी व्यायामाचा कालावधी, आहार याबाबत जागृत राहणे गरजेचे आहे. सुरुवातीला अवघड व्यायाम न करता ज्यामध्ये हृदयावर दाब येणार नाही अशा प्रकारचे हलके व्यायाम करावेत, असे शीव रुग्णालयातील हृदयविकार विभागाचे प्रमुख डॉ. अजय महाजन यांनी सांगितले.

आमच्या व्यायामशाळेत येणारे अनेक जण लवकर वजन कमी करण्यासाठी दिवसभर उपाशी राहतात, असे डोंबिवलीतील ‘फिटनेस क्रिएटर’ या व्यायामशाळेचे प्रशिक्षक राहुल चौधरी यांनी सांगितले. व्यायामाची सुरुवात करण्याच्या १ ते २ तासांपूर्वी चांगला आहार घेणे आवश्यक आहे. केवळ फळे व सलाद खाऊन वजन कमी होत नाही. तर शरीराला सर्व पोषक घटक आवश्यक असतात. त्यामुळे अपघात टाळण्यासाठी व्यायाम करणाऱ्या व्यक्तींनी आहारात ग्लुकोज, कबरेदके, प्रथिने आदी पोषक घटकांचा समावेश करावा, असे चौधरी यांनी सांगितले.

हृदयविकाराचा त्रास असणाऱ्यांनी सद्य:परिस्थितीचा अहवाल देणारा कार्डिओग्राम काढून घ्यावा. ही माहिती व्यायामशाळा प्रमुख आणि डॉक्टरांना दाखवून त्यांच्याकडून सल्ला घ्यावा.   डॉ. अजय महाजन, प्रमुख, हृदयविकार विभाग, शीव रुग्णालय