News Flash

गृह प्रकल्पांमध्ये घर खरेदीवर शून्य टक्के मुद्रांक शुल्क

‘एमसीएचआय’ कल्याण विभागाचा निर्णय, ३१ ऑक्टोबपर्यंत मुदत

(संग्रहित छायाचित्र)

‘एमसीएचआय’ कल्याण विभागाचा निर्णय, ३१ ऑक्टोबपर्यंत मुदत

कल्याण : महाराष्ट्र चेंबर्स ऑफ हाऊसिंग फेडरेशनच्या (एमसीएचआय) कल्याण विभागाने कल्याण-डोंबिवली शहरात घर खरेदी करणाऱ्यांसाठी ‘शून्य टक्के मुद्रांक शुल्क योजना’ सुरू केली आहे. याअंतर्गत ३१ ऑक्टोबपर्यंत  ग्राहकांकडून शासन धोरणाप्रमाणे तीन टक्के मुद्रांक शुल्क न आकारता हे शुल्क थेट विकासकांकडून भरण्यात येणार असल्याची माहिती ‘एमसीएचआय’चे कल्याण विभागाचे अध्यक्ष आणि विकासक श्रीकांत शितोळे यांनी दिली. त्यामुळे  शहरात घर खरेदी करणाऱ्या नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे.

मुंबई शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेली कल्याण, डोंबिवली शहरे परवडणाऱ्या घरांसाठी प्रसिद्ध आहेत. या शहर आणि परिसरात घरे घेण्याचा विविध भागांतील रहिवाशांची सर्वाधिक पसंती आहे. ‘एमसीएचआय’ कल्याण शाखेतील नोंदणीकृत ५० हून अधिक विकासकांचे कल्याण, डोंबिवली परिक्षेत्रात ७५ हून अधिक गृह प्रकल्प सुरू आहेत. यातील काही गृह प्रकल्प पूर्ण झाले असून उर्वरित प्रकल्पांची कामे जोमाने सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या करोनाच्या संकटामुळे गृह विक्रीचा व्यवसाय ठप्प झाला आहे. त्यामुळे या व्यवसायाला गती देण्यासाठी राज्य शासनाने मार्चपर्यंत मुद्रांक शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेण्याचा निर्णय घेतला आहे. याच धोरणाचा एक भाग म्हणून विकासक संघटनेच्या कल्याण विभागाने करोना महामारीची झळ बसलेल्या पण घर खरेदीची इच्छा असलेल्या रहिवाशांना दिलासा म्हणून ‘शून्य टक्के मुद्रांक शुल्क योजना’ राबविण्याचा निर्णय घेतला, असे सचिव विकास जैन यांनी सांगितले. ३१ ऑक्टोबपर्यंत ही राबविण्यात येणार असून महाराष्ट्र चेंबर्स ऑफ हाऊसिंग फेडरेशनच्या नोंदणीकृत प्रकल्पामध्ये घर खरेदी केल्यास ग्राहकांचे संपूर्ण नोंदणी शुल्क विकासक भरणार आहेत. त्यामुळे या परिसरात खरेदी करणाऱ्या ग्राहकांना त्याचा मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे अधिकाधिक ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन शितोळे यांनी केले.

सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन

शून्य टक्के मुद्रांक शुल्क योजनेमुळे कल्याण, डोंबिवली परिसरात घर खरेदी करणाऱ्या ग्राहकाचे फुटामागचे मुद्रांक शुल्क ५०० ते ६०० रुपयांनी कमी होणार आहे. सरकारचे तीन टक्के आणि विकासकांकडून भरले जाणारे तीन टक्के असा सहा टक्के मुद्रांक शुल्क सुटीचा लाभ ग्राहकांना मिळणार आहे. त्यामुळे अधिकाधिक ग्राहकांनी या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन ‘एमसीएचआय’ कल्याणचे माजी अध्यक्ष रवी पाटील यांनी केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 9, 2020 2:57 am

Web Title: zero percent stamp duty on home purchase in housing projects zws 70
Next Stories
1 कल्याण-डोंबिवलीत पुन्हा बांधकामे 
2 नवीन पोलीस मुख्यालय मीरा रोडला
3 कचरा विकेंद्रीकरणाचा निर्णय खड्डय़ांपुरताच
Just Now!
X