११ गावांत १०० टक्के नागरिकांची पहिली मात्रा पूर्ण

ठाणे ग्रामीण भागातील लसीकरणाचा वेग वाढावा यासाठी जिल्हा परिषदेकडून विविध मोहीम राबविण्यात येत आहे

ठाणे : ठाणे ग्रामीण भागात मागील काही दिवसांपासून लसीकरणाचा वेग वाढला असून भिवंडी आणि मुरबाड तालुक्यांतील एकूण ११ गावांतील १०० टक्के लाभार्थीची पहिली मात्रा पूर्ण झाली आहे. यामध्ये भिवंडी तालुक्यातील सात, मुरबाड तालुक्यातील चार गावांचा समावेश आहे.

ठाणे ग्रामीण भागातील लसीकरणाचा वेग वाढावा यासाठी जिल्हा परिषदेकडून विविध मोहीम राबविण्यात येत आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून मोठय़ा प्रमाणात लसीकरण होत असल्याचे चित्र आहे. ठाणे ग्रामीण भागातील भिवंडी आणि मुरबाड तालुक्यांतील ११ गावांतील सर्वच लाभार्थी नागरिकांची पहिली मात्रा पूर्ण झाली आहे. यामध्ये भिवंडी तालुक्यातील टेंभिवली, पालिवली, दिवा, खारबाव, प्हििरगपाडा, वडघर, वडुनवघर, तर मुरबाडमधील पाऱ्हे, चिखले, किशोर आणि साजई या गावांचा समावेश आहे. ठाणे ग्रामीण भागात आतापर्यंत ७ लाख ९८९ नागरिकांनी लशीची पहिली मात्रा घेतली असून त्यापैकी २ लाख २५ हजार १५६ नागरिकांची लशीची दुसरी मात्रा पूर्ण झाली आहे.

ग्रामीण भागातील लसीकरण

तालुका  पहिली मात्रा    दुसरी   मात्रा

अंबरनाथ ७६,२६४        २०,१७२

भिवंडी २,६९,१७६       ७९,०६४

कल्याण १,०७,६५७       ३५,४९३

मुरबाड         ९०,६१३        ३०,९१३

शहापूर         १,५७,२७९       ५९,५१४

एकूण          ७,००,९८९       २,२५,१५६

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: 100 percent first dose of vaccine to citizens in 11 village of thane zws

Next Story
सोनावणेंच्या भ्रष्टाचाराची चौकशी करा
ताज्या बातम्या