scorecardresearch

ठाणे : नातेवाईकाकडून मुलाचा लैंगिक छळ

याप्रकरणी त्याच्या नातेवाईकाविरोधात कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

12 year old boy sexually assaulted
प्रातिनिधिक फोटो- लोकसत्ता

ठाण्यातील घोडबंदर भागात एका १२ वर्षीय मुलाचा नातेवाईकाने लैंगिक छळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या लैंगिक छळामुळे मुलाच्या मानसिकतेवरही परिणाम झाला आहे. याप्रकरणी कासारवडली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घोडबंदर भागात पिडीत मुलगा हा त्याच्या आई-वडिलांसोबत राहतो.

हेही वाचा >>> कल्याण-वसई राष्ट्रीय जलमार्ग: भिवंडी जवळील काल्हेर येथे पाणतळ कामासाठी निविदा प्रक्रियेला प्रारंभ

गेल्याकाही महिन्यांपासून पिडीत मुलाच्या शाळेतील वर्तवणूकीत बदल झाल्याने शाळा प्रशासनाने मुलाच्या पालकांना मुलाला काही दिवस शाळेत पाठवू नका असे सांगितले होते. तसेच त्याच्यावर मानसोपचार तज्ज्ञाकडे उपचार करण्याच्या सूचनाही दिली. त्यानुसार, पिडीत मुलाच्या वडिलांनी त्याला उपचारासाठी मुंबईतील एका मानोसोपचार तज्ज्ञाकडे दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी केली असता, सुमारे दीड वर्षांपूर्वी मुलाच्या नातेवाईकाकडून लैंगिक छळ झाल्याचे समोर आले. याप्रकरणी त्याच्या नातेवाईकाविरोधात कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-02-2023 at 15:28 IST