scorecardresearch

Premium

ठाण्यातील रुग्णालयात एकाच रात्री १६ जणांचा मृत्यू, डीनची पहिली प्रतिक्रिया, मृत्यूचं कारणही सांगितलं

ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात गेल्या १२ तासांत १६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

kalava hospital
संग्रहित फोटो

ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात गेल्या १२ तासांत म्हणजेच शनिवार रात्रीपासून ते रविवार सकाळपर्यंत १६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसह ठाकरे गट आणि मनसेचे नेते आक्रमक झाले आहेत. यावर आता रुग्णालयाचे डीन राकेश बारोट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बारोट यांनी संबंधित रुग्णांच्या मृत्यूची कारणंही सांगितली आहेत.

एकाच रात्री १६ रुग्णांच्या मृत्यूबाबत स्पष्टीकरण देताना रुग्णालयाचे डीन राकेश बारोट म्हणाले, “मृतांमध्ये एक चार वर्षांचा मुलगा होता. त्याने मोठ्या प्रमाणात रॉकेल प्यायलं होतं. त्यामुळे आम्ही त्याला वाचवू शकलो नाही. बाकीचे काही रुग्ण मागील काही दिवसांपासून उपचार घेत होते. कुणी तीन दिवस तर कुणी चार दिवसांपासून उपचार घेत होते.”

nanded death tragedy
नांदेड मृत्यू प्रकरणाची बालहक्क संरक्षण आयोगाकडून दखल; चौकशीतून दोषी निश्चित करण्याचे पोलिसांना आदेश
supriya sule and eknath shinde
“…हे मृत्यू योगायोग नक्कीच नाहीत”, नांदेडच्या घटनेवरून सुप्रिया सुळेंचा सरकारवर गंभीर आरोप
youth dies of cardiac arrest due to high decibel sound during ganesh immersion processions
मिरवणुकीतील आवाजाने दोघांचा हृदयविकाराने मृत्यू ; ११ जणांविरुध्द गुन्हा दाखल
karad conflict
दंगलीनंतर साताऱ्यात तणाव; एकाचा मृत्यू, दहा जखमी, घरे, दुकानांसह प्रार्थनास्थळाचीही जाळपोळ

“एका रुग्णाच्या डोक्याला मार लागला होता. या अज्ञात रुग्णाचाही मृत्यू झाला. तर अन्य एका रुग्णाच्या मेंदूला ट्रॉमा होता, त्यांचाही मृत्यू झाला. दोन रुग्णांची फुफ्फुसं खराब होती. त्या रुग्णांना संसर्ग होऊन मृत्यू झाला. इतर तीन-चार रुग्णांना मल्टी ऑर्डर डिस्फंक्शन झालं होतं. कुणाला हृदयाची समस्या होती, तर कुणाला अनियंत्रित मधूमेह होता. अशा रुग्णांना वाचवण्याचा आम्ही प्रयत्न केला, पण त्यांना वाचवू शकलो नाही”, अशी प्रतिक्रिया डीन राकेश बारोट यांनी दिली.

हेही वाचा- कळवा रुग्णालयात १२ तासांत १६ रुग्णांचा मृत्यू; शेवटच्या क्षणी दाखल केल्याचा प्रशासनाचा दावा!

“आम्ही ५०० बेडच्या रुग्णालयात जवळजवळ ६०० रुग्ण अॅडमिट केले आहेत. येथील डॉक्टर्स २४-२४ तास काम करत आहेत. आम्ही शक्यतो कोणत्याही रुग्णाला परत पाठवत नाही. इकडे येणारा प्रत्येक माणूस गरीब किंवा आदिवासी असतो. ते अनेकदा अत्यावश्यक स्थितीत येतात. ते कसल्याही स्थितीत आले तरी आम्ही त्यांच्यावर उपचार करतो”, असंही बारोट म्हणाले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 16 deaths in thane kalava chatrapati shivaji maharaj hospital dean rakesh barot reaction rmm

First published on: 13-08-2023 at 15:07 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×