scorecardresearch

मुरबाड मधील अपघातात मृत तरुणाच्या कुटुंबीयांना १६ लाखाची भरपाई, कल्याणच्या मोटार अपघात न्यायप्राधिकरणाचा आदेश

नुकसान भरपाई देण्याचे आदेश कल्याणच्या मोटार अपघात न्याय प्राधिकरणाचे अध्यक्ष धनंजय देशपांडे यांनी वाहनाची विमा कंपनी आणि वाहन मालकाला दिले.

मुरबाड मधील अपघातात मृत तरुणाच्या कुटुंबीयांना १६ लाखाची भरपाई, कल्याणच्या मोटार अपघात न्यायप्राधिकरणाचा आदेश
(संग्रहित छायचित्र)

मुरबाड-सरळगाव रस्त्यावर दुचाकीच्या धडकेत मरण पावलेल्या एका तरुणाच्या कुटुंबीयांना १६ लाख ७४ हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश कल्याणच्या मोटार अपघात न्याय प्राधिकरणाचे अध्यक्ष धनंजय देशपांडे यांनी वाहनाची विमा कंपनी आणि वाहन मालकाला दिले. सहा वर्षापूर्वी हा अपघात घडला होता.

हेही वाचा >>>कल्याणमध्ये मोटार सायकलच्या धडकेत पादचारी गंभीर जखमी

सहा वर्षापासून हा दावा मोटार अपघात न्याय प्राधिकरणा समोर सुरू होता. दावा दाखल झाल्यापासूनच्या तारखेपासून विमा कंपनी आणि अपघात घडवून आणणाऱ्या वाहन मालकाने एकत्रितरित्या ही रक्कम मृताच्या कुटुंबीयांना द्यायची आहे.राजेंद्र अनंत धुमाळ (२१) असे दुचाकी अपघातात मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे. तो आपली आई, भावासह मुरबाड तालुक्यातील सरळगाव, वडवली गावात राहत होता. अनंत मुरबाड मधील एका कंपनीत कामगार म्हणून काम करत होता. त्याला दरमहा २१ हजार रुपये वेतन मिळत होते. या वेतनावर त्याच्या कुटुंबीयांची उपजीविका होत होती. अनंताच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली होती. त्यामुळे अनंताची पत्नी अनिता, मुलगा रोहित यांनी ॲड. सचिन माने यांच्या माध्यमातून भरपाईसाठी अपघात प्राधिकरणासमोर पाच वर्षापूर्वी दावा दाखल केला होता.

हेही वाचा >>>ठाणे: नौपाडा पोलीस ठाण्याच्या पोलीस हवालदारावर एसीबीची कारवाई; २५ हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल

मुरबाड मधील शास्त्रीनगर भागात राहणाऱ्या उमेश कराळे आणि न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी या प्रकरणात प्रतिवादी होते. मयत अनंत धुमाळ हा आपल्या मित्राच्या दुचाकीवरुन मुरबाड येथील कंपनीत कामाला चालला होता. त्यावेळी मुरबाड-सरळगाव रस्त्यावर उमेश कराळे याच्या वाहनाने अनंत बसलेल्या दुचाकीला जोराची धडक दिली. अनंतचा जागीच मृत्यू झाला होता, अशी माहिती ॲड. माने यांनी न्यायाधिकारणाला दिली. अनंत घरातील एकाटाच कमावता असल्याने त्याच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आल्याने त्याच्या कुटुंबीयांना १६ लाख ७४ हजाराची भरपाई देण्याची मागणी केली होती. कराळे, विमा कंपनीने भरपाईचा दावा फेटाळण्याची मागणी केली. न्या. देशपांडे यांनी अपघाताला प्रतिवाद वाहन चालक जबाबदार असल्याचे सांगत १६ लाखाची भरपाई देण्याचे आदेश दिले. यामधील ७५ हजार रुपये रक्कम मयताचा भाऊ, एक लाख रुपये मयताचे वडील आणि उर्वरित रक्कम त्याच्या आईला देण्याचे आदेश दिले.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-12-2022 at 16:48 IST

संबंधित बातम्या