डोंबिवली रेल्वे स्थानकात गुरुवारी एका १६ वर्षाच्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा एका ४५ वर्षाच्या प्रवाशाने विनयभंग केला. याप्रकरणी डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा >>> टीएमटी कंत्राटी कामगारांचा संप, प्रवाशांचे हाल; ३०० पैकी ‘इतक्या’ बसगाड्यांची वाहतूक बंद




पिडीत अल्पवयीन मुलगी डोंबिवलीत राहते. ती मुंबईत एका महाविद्यालयात शिक्षण घेते. मुंबईतून लोकलने परतत असताना डोंबिवली रेल्वे स्थानकात एका ४५ वर्षाच्या प्रवाशाने गर्दीचा फायदा घेत तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. गस्तीवरील लोहमार्ग पोलिसांनी तातडीने संबंधित इसमाला ताब्यात घेतले. लोहमार्ग पोलीस ठाण्यात संबंधित प्रवाशावर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि विनयभंग कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांनी सांगितले.