scorecardresearch

Premium

ठाणे जिल्ह्यात १८ हजार पोलिसांचा बंदोबस्त

४८ तास बंदोबस्ताच्या कामात पोलीस व्यस्त असणार आहेत, अशी माहिती ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

18,000 police personnel deployed Thane Anant Chaturdashi Eid-e-Milad processions
ठाणे जिल्ह्यात १८ हजार पोलिसांचा बंदोबस्त (संग्रहित छायाचित्र)

ठाणे: यंदा अनंत चतुर्दशी आणि ईद- ए- मिलाद हे दोन्ही सण एकाच दिवशी आले असले तरी गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी ईदच्या मिरवणूका निघणार आहेत. या दोन्ही मिरवणूकांदरम्यान कोणताही अनूचित प्रकार घडू नये यासाठी ठाणे, नवी मुंबई आणि ठाणे ग्रामीण या सर्व भागात १८ हजार पोलीस अधिकारी आणि कर्माचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. त्यामुळे ४८ तास बंदोबस्ताच्या कामात पोलीस व्यस्त असणार आहेत, अशी माहिती ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

अनंत चतुर्दशी आणि ईद- ए- मिलाद या दोन्ही सणांसाठी शहरात मोठ्याप्रमाणात मिरवणूक निघतात. या मिरवणूकादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे असते. त्यामुळे जिल्ह्यातील ठाणे, नवी मुंबई आणि ठाणे ग्रामीण पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्याचे नियोजन आखले आहे. त्याचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी मंगळवारी ठाणे पोलीस मुख्यालयात बैठक घेतली. या बैठकीला ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे शहर पोलीस आयुक्त जयजीत सिंग, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलींद भारंबे, ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर, ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्यासह पोलीस अधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर देसाई यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

jobs in india
 नोकरीची संधी
Agriculture Minister Dhananjay Munde
पूर ओसरला, पुनर्वसन मंत्र्यांनंतर आता कृषी मंत्री नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर
Yellow mosaic Chandrapur
सोयाबीनवर पिवळा मोझॅकचे आक्रमण, चंद्रपूर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज जाहीर करा; पालकमंत्री मुनगंटीवार यांची मागणी
superintendent Police ordered deportation four criminals Jalgaon district
जळगाव जिल्ह्यातून चार गुन्हेगार हद्दपार; पोलीस अधीक्षकांचे आदेश

हेही वाचा… कल्याणमध्ये महावितरणकडून बेकायदा बांधकामांना वीज पुरवठा, निर्भय बनोच्या पदाधिकाऱ्यांचे उपोषण

अनंत चतुर्दशी आणि ईद -ए- मिलाद हे दोन्ही सण एकाच दिवशी आले आहेत. पोलिसांनी मुस्लिम धर्मियांच्या प्रमुखांची बैठक घेऊन ईद -ए-मिलाद निमित्ताने निघणाऱ्या मिरवणूका दुसऱ्या दिवशी घेण्याचे आवाहन केले होते. त्यास मुस्लिम धर्मियांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. अनंत चतुर्दशी निमित्ताने दोन हजारहून अधिक गणेशमंडळाच्या विसर्जन मिरवणूका निघणार आहे. तर दुसऱ्या दिवशी ईद-ए-मिलाद निमित्ताने मिरवणूका निघणार आहेत. या दोन्ही मिरवणूकांसाठी पोलिसांना ४८ तास बंदोस्त तैनात करावा लागणार आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ठाणे, नवी मुंबई आणि ठाणे ग्रामीण पोलीसांचा १८ हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात असणार आहे. त्यामध्ये काही विशेष पथकांचा सामावेश असेल. दोन्ही मिरवणूका शांततेत पार पाडतील, असे देसाई यांनी सांगितले.

हेही वाचा… कल्याणमधील ट्रक चालकाच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक

शहरात खड्डे बुजविण्याचे काम संबंधित महापालिकेच्या माध्यमातून सुरू असून अनंत चतुर्दशीपूर्वी खड्डे बुजविण्यात येतील, असा दावा देसाई यांनी केला. महापालिका हद्दीमध्ये इतर प्राधिकरणांचेही रस्ते आहेत. या रस्त्यांवरील खड्डेही महापालिकांमार्फत बुजविण्यात येत आहेत. या दुरुस्तीचा खर्च संबंधित प्राधिकरणाकडून महापालिकांना दिला जाणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 18000 police personnel deployed in thane for anant chaturdashi and eid e milad processions dvr

First published on: 26-09-2023 at 18:29 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×