ठाणे : चितळसर पोलिसांच्या कोठडीतून फरार झालेल्या प्रिन्स विश्वकर्मा (१९) याला शनिवारी उत्तरप्रदेश येथील लखनौमधून अटक करण्यात आली आहे. प्रिन्स याला बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक झाली होती. परंतु गुरुवारी गुन्हे प्रकटीकरण कक्षातून बेड्या काढून तो पळून गेला होता. तेव्हापासून पोलीस त्याचा शोध घेत होते.

चितळसर पोलिसांनी प्रिन्स याला ५ नोव्हेंबरला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता पोलिसांना त्याच्याकडून एक पिस्तूल आणि तीन काडतुसे आढळून आली होती. त्याला ठाणे न्यायालयात हजर केल्यानंतर पोलिसांना त्याची कोठडी मिळाली होती. गुन्ह्याचा तपास प्राथमिक असल्याने त्याला चितळसर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आले होते. त्याला बेड्या देखील घालण्यात आल्या होत्या. पोलीस ठाण्यातील एक पोलीस शिपाई त्याच्यावर पाहारा ठेवण्यासाठी नेमला होता. गुरुवारी पहाटे ३.३० वाजताच्या सुमारास संबंधित पोलीस कर्मचारी स्वच्छतागृहात गेला असता, विश्वकर्मा हा हातातील बेड्या हातचालाखीने काढून फरार झाला. फरार होताना त्याने गुन्हे प्रकटीकरण कक्षाच्या दरवाजाची कडी बाहेरून लावली. शिपाई स्वच्छतागृहातून बाहेर आला असता, विश्वकर्मा तेथे आढळून आला नव्हता.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…

हेही वाचा…आम्ही पैसे लाटणारे नाही, तर जनतेचे पैसे जनतेला वाटणारे! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विरोधकांवर टीका

तसेच त्याने बाहेरून कडी लावल्याने कर्मचाऱ्याला तेथून बाहेर देखील पडता आले नाही. या नंतर कर्मचाऱ्याने त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मोबाईलद्वारे संपर्क साधला. कक्षाच्या दरवाजाची कडी उघडल्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु तो आढळून आला नाही.याप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा…निवडणूकीचे काम नाकारणाऱ्या कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई

दरम्यान, प्रिन्स हा उत्तर प्रदेशमधील लखनौ भागात असल्याची माहिती चितळसर पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे, चितळसर पोलिसांचे पथक लखनौला रवाना झाले. शनिवारी लखनौ पोलिसांच्या मदतीने चितळसर पोलिसांनी विश्वकर्मा याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याला अटक केली.

Story img Loader