scorecardresearch

कल्याणमध्ये जमीन व्यवहारात मुंबईतील विकासकाची २२ लाखाची फसवणूक

कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा येथील जमीन मालक आणि त्यांच्या भागीदारांनी मुंबईतील ताडदेव भागात राहणाऱ्या एका विकासकाची जमीन व्यवहार प्रकरणात २२ लाख रुपयांची फसवणूक केली आहे.

fraud
प्रातिनिधिक छायाचित्र

कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा येथील जमीन मालक आणि त्यांच्या भागीदारांनी मुंबईतील ताडदेव भागात राहणाऱ्या एका विकासकाची जमीन व्यवहार प्रकरणात २२ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. मागील आठ वर्षाच्या काळातील हा व्यवहार आहे.या फसवणूक प्रकरणी विकासक दीपक रमेश मेहता (४७, रा. गिरनार इमारत, ताडदेव, मुंबई) यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीप्रमाणे गौरीपाडा येथील रहिवासी बीपिन नारायण गाडे, लक्ष्मीबाई नारायण गाडे, रजनी रवींद्र चौधऱी, आशा संतोष साबळे यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा >>>“दिघे साहेबांची समाधी शिंदे साहेबांनी बांधली म्हणून तिथे तुमची पावलं नाही वळली की..”, शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्केंची उद्धव ठाकरेंवर टीका

पोलिसांनी सांगितले, आरोपी गाडे आणि चौधरी यांची गौरीपाडा येथे मालकी, कब्जे हक्काची जमीन आहे. ही जमीन विकासक दीपक मेहता यांनी एप्रिल २०१५ मध्ये आरोपी गाडे, चौधरी, साबळे यांच्याकडून साठे करार पध्दतीने एक कोटी ५१ लाख रुपयांना खरेदी करण्याचे निश्चित केले होते. व्यवहार नक्की झाल्यानंतर जमीन मालक, कब्जेवहिवाटदार आरोपींनी दस्त नोंदणीव्दारे खरेदीखत करण्यासाठी विकासक दीपक मेहता यांना तगादा लावला. विविध कारणे देऊन आरोपी टाळाटाळ करू लागले. साठे खत करारानाम्याप्रमाणे ठरलेल्या रकमेपैकी २२ लाख रुपये विकासक मेहता यांनी आरोपी जमीन मालक गाडे, चौधरी यांना दिले होते.

हेही वाचा >>>ठाणे: आत्मपरीक्षण करण्याऐवजी आरोप करणाऱ्यांना शुभेच्छा देतो; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना टोला

व्यवहारातील रकमेतील २२ लाखाची रक्कम देऊनही सात वर्ष उलटले तरी जमीन मालक खऱेदी खत करुन देण्यास टाळाटाळ करत आहेत. आपले पैसेही ते परत नसल्याने त्यांनी आपली फसवणूक केली आहे. म्हणून विकासक मेहता यांनी याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार केली. साहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड याप्रकरणाचा तपास करत आहेत.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-01-2023 at 15:51 IST