वीजचोरी केल्याप्रकरणी शहापूर आणि कल्याण पश्चिम उपविभागातील प्रत्येकी दोन असे वीजचोरीचे चार स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात एक औद्योगिक, एक व्यावसायिक व दोन घरगुती ग्राहकांचा समावेश असून वीजचोरीची एकत्रित रक्कम २२ लाख ८६ हजार रुपये आहे.

शहापूर तालुक्यातील आसनगाव येथील गुप्ता औद्योगिक संकुलातील सरवर एच जमशेदपुरी याच्या मालकीच्या व भाडेकरू रमेश दौलत कोतवाल याच्या औद्योगिक गाळ्यात रिमोट कंट्रोलच्या साह्याने मीटरची गती कमी करून वीजचोरी सुरू असल्याचे आढळून आले. याठिकाणी सुमारे १९ लाख ६२ हजार ९८० रुपये किमतीची १ लाख ४४ हजार ६०६ युनिट विजेचा चोरटा वापर झाल्याचे तपासात उघड झाले. तर भातसई गावातील कुक्कूट पालन व्यवसायासाठी प्रवीण हरिभाऊ जाधव यानी मीटर बायपास करून २ लाख ६६ हजार ९० रुपयांची (११ हजार ४२८ युनिट) वीजचोरी केल्याचे आढळून आले.

cases against Jitendra Awhad for remarks on ram to be investigated by shirdi police says bombay hc
श्रीरामाबाबत वादग्रस्त विधान : न्यायालयाने फटकारल्यानंतर आव्हाडांविरोधातील सर्व गुन्हे शिर्डी पोलिसांकडे वर्ग
75 customers cheated over rs 66 crore in the name of giving flats in housing project at Sion
सदनिकेच्या नावाखाली ७५ जणांची ६६ कोटींची फसवणूक; दोघांविरोधात गुन्हा दाखल
Israel air strike on gaza news in marathi
Israel Air Strike on Gaza : गाझामध्ये मोठा नरसंहार! इस्रायलच्या हवाई हल्ल्यात ७१ जणांचा मृत्यू; ‘या’ मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याला केलं होतं लक्ष्य
Sangli, criminals, police, Sangli police,
सांगली : पोलिसांच्या झाडाझडतीत ६० गुन्हेगारांवर कारवाई
Case, Special Public Prosecutor,
माजी आमदाराच्या तक्रारीवरून विशेष सरकारी अभियोक्त्याविरोधात गुन्हा, १० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप
Investigation closed by ED too Failure to trace the source of income in the offenses against the vicar
‘ईडी’कडूनही तपास बंद? वायकर यांच्या विरोधातील गुन्ह्यांत उत्पन्नाचा स्राोत शोधण्यात अपयश
Central government  approves Rs 1898 crore loan proposal for sugar millers
सत्ताधाऱ्यांच्या साखर कारखान्यांवर केंद्र सरकार मेहेरबान
kalyan, Feeding Stray Dogs, Dog Loving Woman Threatened in kalyan, Dog Loving Woman Threatened with Death , Feeding Stray Dogs in kalyan, kalyan news, marathi news,
कल्याणमध्ये श्वानप्रेमी महिलेला नागरिकाची मारण्याची धमकी

शहापूर उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता अविनाश कटकवार यांच्या नेतृत्वाखाली सहायक अभियंता अविनाश क्षिरसागर यांच्या पथकाने ही कारवाई केली असून क्षिरसागर यांच्या फिर्यादीवरून मुरबाड पोलीस ठाण्यात वीजचोरीचे गुन्हे दाखल झाले आहेत.

कल्याण पश्चिम उपविभाग दोनमध्ये गणेश गंगाराम भोईर यानी मीटर बायपास करून ३५ हजार ३०० रुपयांची (२ हजार ५४ युनिट) तर राघो काळू भोईर यानीही मीटर बायपास करून २२ हजार ४४० रुपयांची (१ हजार २४१ युनिट) वीजचोरी केल्याचे तपासात उघड झाले आहे. सहायक अभियंता दीपाली जावळे यांच्या फिर्यादीवरून या दोन्ही घरगुती ग्राहकांविरूद्ध महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात वीजचोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.