scorecardresearch

ठाणे: सासऱ्याच्या जाचाला कंटाळून २२ वर्षीय महिलेची आत्महत्या

ठाण्यातील बाळकूम भागात सासऱ्याच्या जाचाला कंटाळून रेखा सुर्यवंशी (२२) या महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

dead body
सासऱ्याच्या जाचाला कंटाळून २२ वर्षीय महिलेची आत्महत्या (प्रातिनिधिक छायाचित्र)

ठाण्यातील बाळकूम भागात सासऱ्याच्या जाचाला कंटाळून रेखा सुर्यवंशी (२२) या महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रेखा हिच्या भावाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात तिच्या सासऱ्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा >>>“मलाही सुमीत बाबाचा भक्त व्हायचंय”, जितेंद्र आव्हाडांचा खोचक टोला; म्हणाले, “बाबानी फोन केला की लगेच…!”

बाळकूम येथे रेखा या दोन लहान मुले, पती, सासरे शंकर सुर्यवंशी, दीर यांच्यासोबत वास्तव्यास होत्या. रेखा यांना तिचे सासरे हे किरकोळ कारणांवरून मानसिक त्रास देत असत. त्यासंदर्भात रेखाने भाऊ अंकुश पवार यालाही सांगितले होते. २२ मार्चला सकाळी अंकुश कामावर असताना रेखा हिने त्यांना मोबाईलवर फोन करून मानसिक त्रास होत असून तात्काळ बाळकूम येथे येण्यास सांगितले. परंतु अंकुश हे बाळकूम येथे पोहचण्यापूर्वीच रेखाने गळफास घेतला होता. तिला छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले असता डाॅक्टरांनी तिला मृत घोषित केले. याप्रकरणी अंकुश यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे कापूरबावडी पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी शंकर सुर्यवंशी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-03-2023 at 11:28 IST

संबंधित बातम्या