ठाणे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मागील सहा महिन्यांच्या कालावधीत तब्बल ५८५ नागरिकांच्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या अकस्मात मृत्यूंमध्ये तब्बल २५६ नोंदी या आत्महत्येच्या आहेत. तर यामध्ये ३५ वर्षाहून कमी वय असलेल्या नागरिकांची संख्या ही तब्बल १३४ इतकी आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयातर्फे देण्यात आलेल्या आकडेवारीतून हे वास्तव समोर आले आहे. या आकडेवारीमुळे जिल्ह्यातील तरुणांच्या आत्महत्येचा प्रश्न गंभीर असल्याचे चित्र दिसून येत आहे.

हेही वाचा- बदलत्या ठाण्याला वाहतूक कोंडीचे ग्रहण

bmc, mumbai municipal corporation, Tree Lights, Citing Environmental Concerns, tree lights in mumbai, mumbai tree lights, bmc Orders Removal of Tree Lights, mumbai news, environment news, dangerous for insects, bmc news, marathi news,
झाडांवरील रोषणाई सात दिवसात हटवा, पालिका प्रशासनाचे विभाग कार्यालयाना आदेश
Traffic changes in Divisional Commissioner office area due to show of force by candidates Pune news
उमेदवारांच्या शक्ती प्रदर्शनामुळे विभागीय आयुक्त कार्यालय परिसरात वाहतूक बदल… काय आहेत बदल?
Kolhapur jobs 2024 Jilhadhikari Karyalay hiring
Kolhapur jobs 2024 : कोल्हापूरकरांनो, जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरीची संधी! अधिक माहिती पाहा
Brothers Arrested in for more than 12 Crore Online Ticket Scam of Tadoba Andhari Tiger Reserve
ताडोबा ऑनलाईन तिकीट घोटाळाप्रकरणी ठाकूर बंधुंना अटक; १२ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

जिल्ह्यातील होणाऱ्या अकस्मात मृत्यूंची पोलिसांकडून वेळोवेळी नोंदी घेण्यात येतात. या अकस्मात मृत्यूच्या नोंदींची माहिती पोलिसांकडून जिल्हाधिकारी कार्यालयातील उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाला पुढील कार्यवाहीसाठी देण्यात येते. एखाद्या व्यक्तीचा आजार, आत्महत्या, अपघात, भाजून तसेच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्यास त्याची नोंद अकस्मात मृत्यू म्हणून पोलीस ठाण्यात करण्यात येत असते. याच पद्धतीने जुलै २०२२ ते डिसेंबर २०२२ या सहा महिन्यांच्या कालावधीत विविध पोलीस ठाण्यांमध्ये जिल्ह्यात ५८५ नागरिकांच्या अकस्मात मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. यातील चिंताजनक बाब म्हणजे यामध्ये जवळपास निम्म्याहून अधिक २५६ नागरिकांच्या आत्महत्येची नोंद आहे. यातील बहुतांश नागरिकांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले आहे. तर उर्वरितांनी इमारतीवरून उडी मारून, पाण्यात उडी घेऊन तसेच विष प्राशन करून आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच या एकूण आत्मह्त्येपैकी तब्बल १३४ नागरिकांचे वय हे ३५ वर्षाहून कमी आहे. तर या नागरिकांनी त्यांच्या वैयक्तिक कारणांमुळे आत्महत्या केल्याचे पोलीस प्रशासनाच्या अहवालातून समोर आले आहे. तसेच या सर्व अकस्मात मृत्यूंची चौकशी सुरु असून याबाबत मृतांच्या नातेवाईकांना कोणतंही तक्रार अथवा माहिती द्यायची असल्यास त्यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाला भेट देण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा- ठाणे : म्हारळ नाला थेट उल्हास नदीत; फेसाळ सांडपाण्यामुळे नदी प्रदुषित

२० अल्पवयीन मुलांच्या आत्महत्या

जिल्ह्यात मागील सहा महिन्यांच्या कालावधीत २० अल्पवयीन मुलांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. यातील जवळपास सर्व मुलांनी गळफास घेऊन घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा- ठाणे : दुरावस्था झालेल्या गायमुख चौपाटीची होणार दुरुस्ती; सुरक्षारक्षक नेमलेला नसल्यामुळे चौपाटीची पुन्हा दुरावस्था होण्याची भीती

रबाळे पोलीस ठाण्यात सर्वाधिक नोंदी

जिल्ह्यातील विविध पोलीस मागील सहा महिन्यांच्या कालावधीत करण्यात आलेल्या नोंदीमध्ये सर्वाधिक नोंदी या रबाळे पोलीस ठाण्यात ३१ नोंदी करण्यात आल्या आहेत. तर या खालोखाल नेरुळ २४, रबाळे एमआयडीसी २४, काशिमीरा २३, वर्तक नगर १७ यांसह मीरारोड, चितळसर, कळवा, मुंब्रा, कापूरबावडी या पोलीस ठाण्यांमध्ये देखील आत्महत्येच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.