लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

ठाणे : भातसा नदीच्या पात्रावरील पिसे येथील ‘न्यूमॅटिक गेट सिस्टिम’मधील दुरुस्तीचे काम मुंबई महापालिकेने हाती घेतले आहे. या कामामुळे नदी पात्रातील पाण्याची पातळी कमी झाल्याने ठाणे महापालिकेला पाण्याचा पुरेसा उपसा करणे शक्य होत नसून यामुळे पुढील पाच दिवस शहरात ३० टक्के पाणी कपात लागू झाल्याने ठाणेकरांपुढे पाणी संकट उभे राहिले आहे. दरम्यान, ठाणेकरांना पाच दिवसांच्या टंचाईचा सामना करावा लागू नये म्हणून पालिकेने विभागावार २४ तास पाणी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे पाच दिवसांऐवजी केवळ २४ तासाच पाणी पुरवठा बंद राहणार असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

भातसा धरणातील पाणी नदी पात्रात सोडण्यात येते. या नदी पात्रातील पिसे बंधाऱ्यातून मुंबई आणि ठाणे महापालिका पाणी उचलून त्याचा शहरात पुरवठा करते. मुंबई आणि ठाणे महापालिकेचे बंधारे नदी पात्रात काही अंतरावर आहेत. मुंबई महापालिका क्षेत्राला पाणी पुरवठा करणाऱ्या पिसे येथील ‘न्यूमॅटिक गेट सिस्टिम’मध्ये बिघाड झाला आहे. त्याच्या दुरुस्तीचे काम रविवार, १ डिसेंबरपासून सुरू झाले असून या तातडीची तांत्रिक दुरुस्तीच्या कामामुळे ५ डिसेंबरपर्यंत पाणी पुरवठ्यात कपात झाली आहे. ही दुरूस्तीमुळे भातसा नदी पात्रातील पाण्याची पातळी कमी झाली आहे. यामुळे ठाणे महापालिकेला बंधाऱ्यातून पाण्याचा पुरेसा उपसा करणे शक्य होत नसून यामुळे शहरात ३० टक्के पाणी कपातीचा ठाणे महापालिकेस सामना करावा लागत आहे. या पाणी कपातीमुळे संपूर्ण महापालिका क्षेत्रास दररोज ३० टक्के पाणी कपातीचा सामना करावा लागू नये, यासाठी विभागवार सकाळी ९ ते दुसऱ्या दिवशी सकाळी ९ या वेळेत एकेका विभागाचा पाणी पुरवठा २४ तासांसाठी बंद करण्यात येणार आहे. यामुळे पाच दिवसांऐवजी केवळ २४ तासाच पाणी पुरवठा बंद राहणार असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. नागरिकांनी दुरुस्तीच्या काळात तसेच पाणी पुरवठा सुरळीत होईपर्यंत खबरदारीचा उपाय म्हणून पाणी काटकसरीने वापरून सहकार्य करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

आणखी वाचा-डोंबिवलीत सरबतामध्ये गुंगीचे द्रव्य देऊन महिलेवर लैंगिक अत्याचार

असे आहे पाणी नियोजनमंगळवार, ३ डिसेंबर रोजी माजिवडा, मानपाडा, कोठारी कम्पाऊंड, ढोकाळी, मनोरमा नगर, रुणवाल, डोंगरी पाडा, विजय नगरी, विजय पार्क, वाघबीळ, आनंद नगर, कासारवडवली या भागाचा पाणी पुरवठा बंद राहील. बुधवार, ४ डिसेंबर रोजी गांधी नगर, सुभाष नगर, नळपाडा, वसंत विहार, लोकपूरम, लोक उपवन, एमएमआरडीए, तुळशीधाम, सुरकरपाडा, सिद्धांचल, कोंकणीपाडा, गावंड बाग, उन्नती, शास्त्री नगर १ व २, मैत्री पार्क या भागांचा पाणी पुरवठा बंद राहील. गुरूवार, ५ डिसेंबर रोजी सिद्धेश्वर, चंदनवाडी, पाटीलवाडी, चरई, मावळी मंडळ, कोलबाड, गोकूळ नगर, आझाद नगर, खोपट, सिव्हील हॉस्पिटल परिसर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड परिसर या भागांचा पाणी पुरवठा बंद राहील. शुक्रवार, ६ डिसेंबर रोजी दत्तवाडी, बॉम्बे कॉलनी, जीवन बाग, मुंब्रा देवी, शैलेश नगर, उदय नगर, रेतीबंदर, सम्राट नगर, नारायण नगर, मेक कंपनी, जलकुंभ ते शंकर मंदिर, संजय नगर परिसर या भागांचा पाणी पुरवठा बंद राहील. शनिवार, ७ डिसेंबर रोजी राबोडी १ व २, आकाशगंगा, जेल टाकी परिसर, जरी मरी, वृंदावन, श्रीरंग, विकास कॉम्प्लेक्स, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, कळवा, मनिषा नगर, आतकोणेश्वर नगर, भास्कर नगर, पौड पाडा, खारेगाव, रघुकुल, पारसिक नगर या भागांचा पाणी पुरवठा बंद राहील. रविवार, ८ डिसेंबर रोजी लोकमान्य पाडा नं. १, २, दोस्ती, वेदांत, आकृती संकुल, अरुण क्रीडा मंडळ, मनोरुग्णालय परिसर, रहेजा, कशिश पार्क, शिवाजी नगर, धर्मवीर नगर, साठेवाडी, रघुनाथ नगर, इटर्निटी, विष्णूनगर, भास्कर कॉलनी, ब्राम्हण सोसायटी, घंटाळी, राम मारूती रोड या भागांचा पाणी पुरवठा बंद राहील.

Story img Loader