लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली: येथील एकता को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमीटेड या पतसंस्थेच्या डोंबिवली शाखेत शाखाधिकारी सचीन इथापे यांनी मागील वर्षभराच्या कालावधीत पतसंस्थेतील ग्राहकांच्या ठेव रकमा, तारण सोने ऐवजांमध्ये हेराफेरी करुन पतसंस्थेत ३८ लाख ५९ हजार ७२३ रुपयांचा अपहार केला आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

एकता पतसंस्थेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हा प्रकार निदर्शनास आल्यावर हा गैरव्यवहार उघडकीला आला. याप्रकरणी एकता पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पोळ यांच्या तक्रारीवरुन डोंबिवलीतील टिळकनगर पोलिसांनी शाखाधिकारी सचीन इथापे यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

पोळ यांनी तक्रारीत म्हटले आहे, की भिवंडी येथे निवास असणारे सचीन इथापे हे डिसेंबर २०२२ ते मे २०२३ कालावधीत एकता को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमीटेडच्या डोंबिवली शाखेत शाखाधिकारी होते. या कालावधीत त्यांनी पदाचा दुरुपयोग करुन ग्राहकांनी शाखेत सोने तारण ठेऊन कर्ज घेतले आहे. अशा तीन कर्जदारांच्या पतसंस्थेतील सोन्याच्या पिशवीतील खरे सोने काढून घेऊन त्या जागी बनावट सोने ठेवले. अस्सल सोने आयआयएफएल फायनान्स कंपनीत गुंतवणूक म्हणून ठेऊन तीन कर्जदारांची, पतसंस्थेची चार लाख ७४ हजार रुपयांची फसवणूक केली.

हेही वाचा… दिवा-रत्नागिरी विशेष शटल सेवेला प्रवाशांची तुफान गर्दी

ग्राहकांच्या मूळ सोन्याचे सराफाकडून इथापे यांनी मूल्यांकन करुन घेतले. या सोन्यावर पतसंस्था आणि ग्राहकांना अंधारात ठेऊन पतसंस्थेतील ११ ग्राहकांच्या नावे २४ लाख १३ हजार रुपयांचे बनावट सोने कर्ज प्रकरण इथापे यांनी तयार केले. अशाच पध्दतीने ग्राहकांच्या ठेव रकमा, बोगस कर्ज प्रकरणातील रकमा स्वतासाठी वापरल्या. रिक्षा चालक संतोश सिंग यांनी रिक्षेसाठी एकता पतसंस्थेतून २ लाख ४६ हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. या रकमेतील एक लाख १ लाख ३४ हजार रुपये सिंग यांनी इथापे यांच्या ताब्यात दिले. ती रक्कम इथापे यांनी पतसंस्थेत न भरता स्वतासाठी वापरली. सिंग यांच्यावरील संस्थेचा बोजा उतरविण्यासाठी सिंग यांच्या स्वाक्षरीने बनावट कागदपत्रे तयार केली, असे तक्रारीत म्हटले आहे.

हेही वाचा… कल्याण-डोंबिवलीत खड्डे, खडीतून गणपती बाप्पांचा प्रवास

शाखाधिकारी इथापे यांनी रवीकुमार सब्बानी, सुप्रिया जांबळे, सुनंदा जाधव, कुमारस्वामी वैंगल, राणी सैबेवार, श्वेता पेद्राम, दीपिका येल्लाराम अशा एकूण ११ जणांनी पतसंस्थेत तारण ठेवलेले खरे सोने काढून घेऊन त्यांच्या पिशव्यांमध्ये खोटे सोने ठेवले. या ११ जणांच्या नावे इथापे यांनी २४ लाख १३ हजाराचे कर्ज परस्पर उचलून पतसंस्था आणि ग्राहकांची फसवणूक केली, असे मुख्य कार्यकारी अधिकारी पोळ यांनी म्हटले आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी पोळ, उपव्यवस्थापक सायली महाडिक, साहाय्यक उपव्यवस्थापक शुभदा शिंदे यांच्या प्रयत्नातून इथापे यांचा गैरव्यवहार उघडकीला आला.

एकता पतसंस्थेतून कर्ज घेतलेल्या काही ग्राहकांना उपव्यवस्थापक महाडिक, शिंदे संपर्क करुन ‘तुमच्या कर्जाची मुदत संपली आहे. तुम्ही अद्याप कर्ज रक्कम का भरणा करत नाहीत,’ अशी विचारणा करत होत्या. त्यावेळी कर्जदार आम्ही कर्जाची परतफेड कधीच केली आहे, अशी उत्तरे देत होते. त्या चौकशीतून इथापे यांनी केलेला घोटाळा उघडकीला आला आहे.

Story img Loader