लोकसत्ता खास प्रतिनिधी

ठाणे : केंद्र शासनाच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा उपक्रमांतर्गत १२३ पर्यावरणपुरक विजेवरील बसगाड्या खरेदी करण्यात आल्या असून त्यापाठोपाठ केंद्र सरकारकडून नव्याने मिळालेल्या निधीतून आणखी ४२ बसगाड्या खरेदी करण्याचा निर्णय ठाणे परिवहन प्रशासनाने सुरू केली आहे. तसेच ठरवून दिलेल्या मुदतीत १२३ बसगाड्यांचा पुरवठा करण्यास असमर्थ ठेकेदारामुळे ठाणेकर बसगाड्यांच्या प्रतिक्षेत असून यामुळेच नव्या बसगाड्यांच्या पुरवठा निविदेत जुन्या ठेकेदाराने सहभागी होऊ नये यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू असल्याची माहिती पालिका सुत्रांनी दिली.

trees in Mumbai being killed by poison
पूर्व द्रुतगती मार्गावरील ५० झाडांवर विषप्रयोग; पालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
Vendors throw vegetables, Protest against nmc, Nashik Municipal Corporation, Demand Space for Business, nashik news, vendors protest news, marathi news, protest in nashik,
नाशिक महापालिकेसमोर भाजीपाला फेकून आंदोलन – अतिक्रमण निर्मूलन कारवाईचा निषेध
pleas challenging maratha quota in bombay hc
मराठा आरक्षण : प्रवेश, नोकऱ्यांवर टांगती तलवार; नियुक्त्या अंतिम निर्णयाच्या अधीन – उच्च न्यायालय
retired employees of KEM
केईएममधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन

ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात एकूण ३६४ बसगाड्या आहेत. त्यापैकी उपक्रमाच्या स्वत:च्या १२४ बसगाड्या आहेत. तर, उर्वरित २२० बसगाड्या ठेकेदारामार्फत जीजीसी तत्वावर चालविण्यात येत आहेत. एकूण ३६४ पैकी ३०० बसगाड्या प्रत्यक्षात प्रवासी सुविधेसाठी उपलब्ध होत आहेत. शहरातील प्रवाशी संख्येच्या तुलनेत मात्र या बसगाड्या अपुऱ्या पडत आहेत. यामुळे परिवहनच्या ताफ्यातील बसगाड्यांची संख्या वाढविण्यासाठी प्रशासनाने गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून केंद्र शासनाच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा उपक्रमांतर्गत उपलब्ध झालेल्या निधीतून १२३ पर्यावरणपुरक बसगाड्या खरेदी करण्यात आल्या आहेत. त्यापैकी प्रत्यक्षात मात्र १३ बसगाड्याच दाखल होऊ शकल्या आहेत. यंदाच्या वर्षी केंद्र शासनाकडून राष्ट्रीय स्वच्छ हवा उपक्रमांतर्गत १५ कोटी ५० लाखांचा निधी ठाणे महापालिकेला उपलब्ध झाला असून या निधीतून आणखी ४२ बसगाड्या खरेदी करण्याचा निर्णय ठाणे परिवहन उपक्रमाने घेतला आहे. त्यात ९ मीटरच्या २५ तर, १२ मीटरच्या १७ बसगाड्या खरेदी करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला असून या कामासाठी लवकरच निविदा काढली जाणार आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली.

आणखी वाचा-कल्याण लोकसभा मतदारसंघातील हक्काच्या मतदारसंघ बांधणीवर भाजपचा भर

ठेकेदाराची नाकेबंदी

ठाणे परिवहन उपक्रमांच्या ताफ्यात १२३ बसगाड्या टप्पाटप्प्याने दाखल होणार होत्या. त्यासाठी परिवहन प्रशासनाने मुदत ठरवून दिली होती. यानुसार १५ जानेवारी २०२३ पर्यंत ३१ आणि १५ मार्च २०२३ पर्यंत ३१ अशा एकूण ६२ बसगाड्यांचा पुरवठा ठेकेदार करणार होता. या मुदतीत जेमतेम १३ बसगाड्या दाखल होऊ शकल्या आहेत. उर्वरित बसगाड्या दाखल होऊ शकलेल्या नव्हत्या. यामुळे ठाणे परिवहन प्रशासनाने संबंधित ठेकेदारावर प्रति बस २० हजार रुपये याप्रमाणे १२ लाख ४० हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे. बस पुरवठा करण्यास असमर्थ ठरलेल्या ठेकेदारामुळे ठाणेकर बसगाड्यांच्या प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे नव्या बसगाड्यांच्या पुरवठ्यात अशीच दिरंगाई होऊ नये यासाठी पालिकेने आतापासून काळजी घेण्यास सुरूवात केली असून त्याचाच एक भाग म्हणून नव्या बसगाड्यांच्या पुरवठा निविदेत जुन्या ठेकेदाराने सहभागी होऊ नये यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.