कल्याण – रस्ते, विकास प्रकल्पांसाठी जागा देणाऱ्या बाधित ४९१ रहिवाशांना झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत घरे देण्याचा निर्णय कल्याण डोंंबिवली पालिका प्रशासनाने घेतला आहे. मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा विषय मार्गी लागल्याने लाभार्थींनी समाधान व्यक्त केले आहे.

८ फेब्रुवारी रोजी कल्याणमधील आचार्य अत्रे रंगमंदिरात घरे वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पारदर्शक पद्धतीने हा कार्यक्रम पार पडेल. पात्र लाभार्थींनी त्यांना केलेल्या सूचनेप्रमाणे आवश्यक मूळ कागदपत्रे घेऊन उपस्थित राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. मागील २५ वर्षांच्या कालावधीत कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत रस्ता रुंदीकरण, नागरी सुविधा प्रकल्प आणि इतर विकास कामांसाठी पालिकेने नागरिकांकडून जागा हस्तांतरित केल्या आहेत. काही रहिवासी या प्रकल्पात बाधित झाले आहेत. अशा बाधितांना घरे देण्याची हमी प्रशासनाने वेळोवेळी बाधितांना दिली आहे.

port at vadhvan, vadhvan,
वाढवण येथील पर्यावरणस्नेही बंदराचा मार्ग मोकळा
Farmers, Farmers news,
प्रकल्प घोषणेपूर्वी शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे
Slum cleaning contract
झोपडपट्टी स्वच्छता कंत्राट : चौथ्यांदा मुदतवाढीची नामुष्की, १५ एप्रिलला न्यायालयात सुनावणी
1311 objections to the proposed Shaktipeeth Highway
प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला विरोधासाठी १३११ हरकती

हेही वाचा – मालगाडीवर चढून ओव्हर हेड वायरचा धक्का लागून मुलगा गंभीर जखमी, कल्याण रेल्वे यार्डातील घटना

पालिकेच्या १० प्रभाग स्तरावरून एकूण ६६२ रस्ते बाधितांंचे प्रस्ताव पालिका मुख्यालयात प्राप्त झाले होते. पुनर्वसन समितीने या सर्व प्रस्तावांची पडताळणी केली. त्यामधील ४८ जणांनी योग्य माहिती न दिल्याने त्यांचे प्रस्ताव फेटाळून लावून त्यांंना अपात्र ठरविण्यात आले आहे. १२३ जणांनी आवश्यक कागदपत्रे जमा केली नाहीत. या अपूर्णतेबद्दल त्यांचे प्रस्ताव प्रलंबित ठेवण्यात आले आहेत. १२३ जणांनी विहित वेळेत पालिकेला त्यांची अपूर्ण कागदपत्रे जमा केली तर त्यांच्या बाबतीत पुनर्वसन समिती तातडीने निर्णय घेणार आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.

पुनर्वसन समितीने पात्र केलेल्या लाभार्थींची यादी प्रभाग क्षेत्र कार्यालये, पालिका मुख्यालय, मालमत्ता विभागांच्या सूचना फलकावर लावण्यात आली आहे. सर्व पात्र प्रकल्प बाधितांना त्यांच्या घर परिसरातील झोपु योजनेत घर देण्याचे प्रशासनाने निश्चित केले आहे. एकाच ठिकाणी ५० वर्षांहून अधिक काळ वास्तव्य केल्याने मुलांच्या शाळा, बाजारपेठ, रेल्वे स्थानकापासूनचे अंतर याचा विचार करून जुन्या घरालगतच्या झोपु योजनेत घरे देण्याची मागणी बाधितांनी पालिकेकडे केली होती. त्यामुळे कल्याण, टिटवाळा भागातील अ प्रभाग, ब आणि क प्रभागातील पात्र लाभार्थींना मौजे उंबर्डे येथील झोपु योजनेत घरे वाटपाचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. कल्याण पूर्व, डोंबिवली, ठाकुर्ली परिसरातील बाधितांना पाथर्ली इंदिरानगर येथील झोपु योजनेतील घरे वाटप केली जाणार आहेत. प्रकल्प बाधितांची संख्या, झोपु योजनेतील उपलब्ध सदनिका पाहता सदनिका वितरणाचा अंतीम निर्णय आयुक्तांनी राखून ठेवला आहे. पालिकेच्या संकेतस्थळावर पात्र लाभार्थींची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. दरम्यान, डोंबिवलीतील दत्तनगरमधील ९० अपात्र लाभार्थींना इंदिरानगर येथील झोपु योजनेत घरे देण्याचा राजकीय मंडळींचा प्रयत्न वास्तुविशारद संदीप पाटील यांच्या उच्च न्यायालयातील याचिकेमुळे मागे पडला आहे.

हेही वाचा – ठाणे : मध्य रेल्वे आणि महापालिकेच्या वाहनतळात कंत्राटदारांकडून लुबाडणूक सुरूच

रस्ते बाधितांमधील पात्र लाभार्थींना झोपु योजनेत सदनिका वाटपाचा कार्यक्रम अत्रे रंगमंदिर येथे ८ फेब्रुवारी रोजी आयोजित केला आहे. पारदर्शक पद्धतीने सर्वांसमक्ष हे वाटप होईल. मूळ कागदपत्रांसह लाभार्थींनी उपस्थित राहावे. – डाॅ. इंदुराणी जाखड, आयुक्त.