डोंबिवलीत ६५ बेकायदा इमारती उभारताना भूमाफियांनी कल्याण डोंबिवली पालिका नगररचना विभागाच्या बनावट परवानग्या, जिल्हाधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या, शिक्क्यांचा वापर करून अकृषिक, बांधकाम परवानग्या तयार केल्या. या आधारे महाराष्ट्र स्थावर संपदा विभागाची फसवणूक करून त्यांच्याकडून रेरा नोंदणीकृत क्रमांक मिळविला. ही सर्व कागदपत्रे भूमाफियांनी डोंबिवलीतील गांधीनगरमधील दस्त नोंदणी कार्यालयात नोंदणीकृत करून त्याआधारे घर खरेदीदारांची फसवणूक केली. ही सर्व नोंदणीकृत कागदपत्र ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या विशेष तपास येथील दस्त नोंदणी कार्यालयातून तपासासाठी ताब्यात घेतली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डोंबिवलीतील ६५ बेकायदा इमारत प्रकरणाचा तपास करणाऱ्या ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष तपास पथकातील एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. ६५ बेकायदा बांधकामांची माहिती घेण्यासाठी आमचे पथक डोंबिवलीतील गांधीनगरमधील दस्त नोंदणीकरण कार्यालयात गेले होते. तेथील अधिकाऱ्यांनी चांगले सहकार्य करून ६५ बेकायदा बांधकामांची दस्त नोंदणीची नोंदणीकृत कागदपत्र तपास पथकाला उपलब्ध करून दिली, असे तपास पथकाच्या अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा – ठाणे : कल्याण जवळ ५६ लाखांचा बनावट विदेशी दारूचा बनावट साठा जप्त

नोंदणीकृत केलेल्या प्रत्येक कागदपत्राची सत्यता कागदपत्राशी संबंधित असलेल्या कल्याण डोंबिवली पालिका नगररचना, जिल्हाधिकारी कार्यालय, भूमि अभिलेख विभाग, भूमापक, संबंधित विभागाच्या अभिलेख विभागातून पडताळून पाहिली जाणार आहे. या बेकायदा बांधकाम प्रकरणातील प्रत्येक कागद न्यायालयात टिकला पाहिजे, अशा पद्धतीने या कागदपत्रांची छाननी केली जात आहे, असे तपास अधिकारी म्हणाला.

तपास थंडावला?

डोंबिवलीतील चौकशीच्या फेऱ्यातील ६५ बेकायदा बांधकाम प्रकरणांमध्ये कल्याण डोंबिवली पालिकेकडून जी आवश्यक कागदपत्रे मिळणे आवश्यक आहे, ती मिळत नाहीत. त्यामुळे तपासात अडथळे येत आहेत, असे सांगून तपास अधिकारी म्हणाला, माफियांनी इमारत बांधले एक जागी, त्या बांधकामासाठी कागदपत्र अन्य सर्व्हे क्रमांकाच्या नावे तयार करण्यात आले आहे. इमारतीची सत्यता पडताळणी करताना अनेक अडथळे येत आहेत. या कामासाठी कल्याण डोंबिवली पालिका, भूमि अभिलेख, महसूल विभागाकडून ज्या तत्परतेने सहकार्य मिळणे आवश्यक आहे ते मिळत नसल्याने याप्रकरणाची चौकशी अडथळ्यांवर मात करत सुरू आहे, असे अधिकारी म्हणाला. तर, कल्याण डोंबिवली पालिकेच्या अधिकाऱ्याने मात्र, पोलिसांचे विशेष तपास पथक स्वतंत्रपणे काम करत आहे. आमच्या त्या चौकशीशी काही संबंध नाही. आम्ही जेवढे सहकार्य तपास पथकाला करणे आवश्यक आहे तेवढे करत आहोत.

लोकसत्ता टीम

बेकायदा बांधकामांची कागदपत्रांची सत्यता, जुळवाजु‌ळव करताना अनावश्यक वेळ जात आहे. अनेक कागदपत्र कायद्याच्या कसोटीवर टीकत नाहीत. त्यामुळे या प्रकरणात आरोपीस अटक केले की त्याला तात्काळ जामीन मिळत आहे. जामिनाविषयी आम्ही गांभीर्याने विचार करत आहोत, असे तपास अधिकारी म्हणाला. ६५ बेकायदा बांधकाम प्रकरणातील बहुतांशी भूमाफिया तपास पथकातील एका अधिकाऱ्याचा वर्ग मित्र वास्तुविशारदाच्या माध्यमातून शिळ रस्त्यावरील उच्चभ्रूंच्या गृहसंकुलातील अण्णाच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना भेटून आलो आहोत. आता आमचे काहीही होणार नाही, अशी दर्पोक्तची भाषा करत उजळ माथ्याने डोंबिवलीत फिरत आहेत. तपास पथकाच्या अधिकाऱ्याने तपासात माहिती जशी पुढे येत आहे. त्याप्रमाणे बांधकामधारकांना आम्ही चौकशीसाठी बोलवत आहोत. चौकशी व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची भेट आम्ही कोणालाही देत नाही, असे तपास पथकातील एका अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा – ठाणे : सैनिकांना मानवंदना देण्यासाठी गेटवे ऑफ इंडिया ते डोंबिवली दौड, २६ जानेवारीला रनर्स क्लॅनचा उपक्रम

“तपास पथकाने डोंबिवलीतील दस्त नोंदणीकरण कार्यालयातील ६५ बेकायदा इमारत प्रकरणांची कागदपत्र ताब्यात घेतली आहेत. इतर शासकीय संस्थांकडून आवश्यक कागदपत्रांसाठी सहकार्य मिळत नाही, त्यामुळे तपासात अडथळे येत आहेत”, असे तपास पथक प्रमुख, सहाय्यक पोलीस आयुक्त सरदार पाटील म्हणाले.

सरदार पाटील
साहाय्यक पोलीस आयुक्त
तपास पथक प्रमुख, ठाणे

फोटो ओळ

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 65 land mafias illegal registration documents in dombivli in custody of special investigation team ssb
First published on: 23-01-2023 at 14:39 IST