ठाणे जिल्ह्यात शनिवारी ६८ करोना रुग्ण आढळले

जिल्ह्यात गेल्याकाही दिवसांपासून करोना रुग्णसंख्येत वाढ होत असताना शनिवारी जिल्ह्यात ६८ करोना रुग्ण आढळून आले आहेत.

corona patients in thane
ठाणे शहरात शहरात आढळले कोरोना नवा उपप्रकारचे नऊ रुग्ण(प्रातिनिधिक छायाचित्र)

ठाणे : जिल्ह्यात गेल्याकाही दिवसांपासून करोना रुग्णसंख्येत वाढ होत असताना शनिवारी जिल्ह्यात ६८ करोना रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ठाणे शहरातील ५१ रुग्णांचा सामावेश आहे. जिल्ह्यात आठवड्याभरात चार जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी तीनजण हे ठाणे शहरातील असल्याचे यापूर्वी स्पष्ट झाले आहे. ठाणे शहरात झपाट्याने करोना रुग्ण वाढत असल्याने आरोग्य विभागाच्या चिंतेत भर पडली आहे.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

हेही वाचा – राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ कल्याणमध्ये काँग्रेसचा मोर्चा

हेही वाचा – ठाण्यात राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ जितेद्र आव्हाड यांचे बॅनर; ‘सुडाचे राजकारण हा देश सहन करणार नाही’ अशा आशयाचे फलक

जिल्ह्यातील एकूण सक्रिय २९४ पैकी २४८ सक्रिय रुग्ण हे ठाणे महापालिका क्षेत्रातील आहेत. ठाणे पाठोपाठ नवीमुंबई ६, ठाणे ग्रामीण आणि भिवंडी प्रत्येकी ३, कल्याण – डोंबिवली व मीरा-भाईंदर प्रत्येकी २ आणि उल्हासनगर महापालिका क्षेत्रात १ करोना रुग्ण आढळून आल्याची माहिती ठाणे जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिले. जिल्ह्यात मागील आठवड्याभरात चार रुग्णांचा मृत्यू झाला असून, ठाणे शहरातील तिघांचा यामध्ये सामावेश आहे. तर शनिवारी शहरात एच ३ एन २ आजाराचा एक रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्या चिंतेत भर पडली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-03-2023 at 23:01 IST
Next Story
ठाण्यात राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ जितेद्र आव्हाड यांचे बॅनर; ‘सुडाचे राजकारण हा देश सहन करणार नाही’ अशा आशयाचे फलक
Exit mobile version