डोंबिवली – आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून डोंबिवलीतील रामनगर भागातील सर्थक वेल्थ मॅनेजमेंट गुंतवणूक कंपनीकडून सहा गुंतवणूकदारांची ७३ लाख ५० हजार रूपयांची फसवणूक केली आहे. मार्च २०२० ते एप्रिल २०२३ या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रंजीत बयास असे गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. डोंबिवली पूर्वेतील रामनगरमधील पंडित मालविय पथावरील सरस्वती कॅशल इमारतीमध्ये हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे. घाटकोपर येथे राहणारे दीपक मेघजी सावला (५५) या व्यावसायिकाच्या तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात अन्य पाच गुंतवणूकदार आहेत. त्यांचीही आरोपीने फसवणूक केली आहे.

पोलिसांनी सांगितले, रंजीत बयास यांची सर्थक वेल्थ मॅनेजमेंट ही गुंतवणूकदार कंपनी आहे. या कंपनीत गुंतवणूक केल्यास कमी कालावधीत झटपट परतावा मिळेल असे आमिष आरोपी रंजीत बयास गुंतवणूकदारांना दाखवत होता. या आमिषाला बळी पडून घाटकोपर येथील व्यावसायिक तक्रारदार दीपक सावला यांनी ५० लाख रूपयांची गुंतवणूक सर्थक वेल्थ कंपनीत केली. दोघांनी मिळून सामंजस्य करार केला. या कराराप्रमाणे आरोपी रंजीत बयास याने सावला यांना ठराविक टप्प्यात गुंतवणूक रकमेवर व्याज देण्याचे लेखी आश्वासन दिले होते.

हेही वाचा >>>टिएमटीच्या ताफ्यात वर्षभरात १८६ विद्युत बसगाड्या, ठाणेकरांचा प्रवास सुखकर होणार

कराराप्रमाणे रंजीत याने सावला यांना एक वर्ष उलटून गेले तरी व्याज रक्कम दिली नाही. विविध कारणे देऊन तो व्याज देण्यास टाळाटाळ करत होता. अशापध्दतीने आरोपीने इतर पाच जणांकडून २३ लाख रूपये गुंतवणुकीसाठी घेतले होते. त्यांना आरोपी व्याज देत नव्हता. सतत मागणी करूनही आरोपी व्याज देत नाही. मूळ रक्कम परत देण्याची मागणी करूनही तो मूळ रक्कमही परत देत नव्हता. त्याने आपली गुंतवणूक रक्कम स्वताच्या स्वार्थासाठी वापरून आपल्या गुंतवणूक रकमेचा अपहार केला म्हणून सावला यांच्यासह पाच जणांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलीस उपनिरीक्षक नलावडे तपास करत आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 73 lakh defrauded of investors by sarthak wealth management company in dombivli amy
Show comments