शेअर बाजारात आणि छोट्या उद्योगात एक लाखाच्या गुंतवणुकीवर दरमहा पाच हजार रूपये परतावा मिळवून देतो असे सांगून डोंबिवलीतील एका दाम्पत्याने १५ गुंतवणूकदारांची ९४ लाखाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या दाम्पत्याने गेल्या सात वर्षात गुंतवणुकदारांकडून ही रक्कम स्विकारून त्यांना ठरल्याप्रमाणे परतावा दिला नाही. याशिवाय, मूळ रक्कमही परत करीत नव्हते. याप्रकरणी गुंतवणुकदारांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे टिळकनगर पोलीस ठाण्यात दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबईत सीमा शुल्क विभागातील अधिकारी प्रसाद राऊत यांचीही फसवणूक झाली असून त्यांच्या पुढाकाराने इतर १४ गुंतवणूकदारांनी टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. प्रसाद काशिनाथ राऊत हे डोंबिवली पूर्वेतील ठाकुर्ली जवळील खंबाळपाडा भोईरवाडीतील स्नेहा रेसिडेन्सी इमारतीत राहतात. त्यांच्या शेजारी रवी गुरव, इफी गुरव हे दाम्पत्य राहते. शेअर मार्केटचा व्यवसाय करत असल्याचे दाम्पत्याने प्रसाद राऊत यांना सांगितले. तसेच छोटा उद्योगही असल्याचे सांगितले. शेअर बाजार आणि छोट्या उद्योगातील गुंतवणूक योजनेत एक लाख रूपये गुंतवले तर दरमहा पाच हजार रूपये परतावा देतो, असेही त्यांनी सांगितले. त्यांच्या भुलथापांना बळी पडून प्रसाद यांनी दोन वर्षापूर्वी दोन लाख २५ हजार रूपये योजनेत गुंतवले. सुरूवातीला त्या दाम्पत्याने त्यांना दरमहा ११ हजार रूपयांप्रमाणे ६८ हजार रूपयांचा परतावा दिला. त्यानंतर त्यांनी परतावा दिला नाहीच. तसेच मूळ रक्कमही परत करण्यास टाळाटाळ सुरू केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच प्रसाद यांनी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली.

narendra modi sanjay singh
“तोट्यातल्या कंपन्यांकडून भाजपाला कोट्यवधींचं दान, काही कंपन्यांकडून नफ्याच्या ९३ पट देणग्या”, निवडणूक रोख्यांवरून आपचे गंभीर आरोप
bank of Maharashtra loan disbursement increased by 16 percent
‘महाबँके’च्या कर्ज वितरणात १६ टक्क्यांची वाढ
fraud of 44 lakh with investors in Dombivli by giving lure of increased interest
वाढीव व्याजाच्या आमिषाने डोंबिवलीतील गुंतवणूकदारांची ४४ लाखाची फसवणूक
Pune, Youth Cheated, Rs 57 Lakh, Stock Market Investment Scam, NDA Employee, cyber fraud, Victims, lure, police, marathi news,
पुणे : गुंतवणुकीच्या आमिषाने ‘एनडीए’तील कर्मचाऱ्याची ५७ लाखांची फसवणूक

प्रसाद राऊत यांच्या सारखीच डोंबिवली परिसरातील खासगी शिकवणी चालक, दुकानदार, नोकरदार यांची फसवणूक गुरव दाम्पत्याने केली आहे. आकर्षक परतावा देतो असे सांगून त्यांनी गुंतवणूकदार सुभाष नलावडे यांच्याकडून दोन लाख रूपये स्वीकारले आहेत. सारिका पवार यांच्याकडून एक लाख रुपये, पंकज भंडारे, त्यांची आई आणि वडिल यांच्याकडून एकूण ४० लाख रूपये, स्वाती जाधव यांच्याकडून पाच लाख, नितीन गडवे यांच्याकडून दोन लाख रुपये, नीता पेडणेकर आणि सुरेंद्र भालेकर यांच्याकडून आठ लाख रुपये, हेमंत पांचाळ यांच्याकडून चार लाख ५० हजार रुपये, सागर गोगरकर यांच्याकडून चार लाख रुपये, जिग्नेश पवार यांच्याकडून २५ हजार रुपये, घनश्याम पाटील यांच्याकडून ११ लाख रुपये, जितेंद्र कासार यांच्याकडून पाच लाख रुपये, मुग्धा सावंत यांच्याकडून दोन लाख रुपये, स्वाती महाडेश्वर यांच्याकडून दोन लाख ७५ हजार रूपये घेऊन गुरव दाम्पत्याने त्यांची फसवणूक केली आहे.

गुंतवणूकदारांनी सुरूवातीला टिळकनगर पोलीस ठाण्यात गुरव दाम्पत्याविरोधात तक्रार केली होती. गुरव दामप्त्याने गुंतवणूकदारांच्या रकमा आपण परत करणार असल्याचे आश्वासन दिले होते. आश्वासन देऊनही ते पैसे परत करत नसल्यामुळे १५ गुंतवणूकदारांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. गुरव दाम्पत्य खंबाळपाडा भोईरवाडीत स्नेहा इमारतीत आणि डोंबिवली पूर्वेतील मानपाडा रस्त्यावरील शिवाजी उद्योनगरमधील सरला नगर संकुलात राहतात.