ठाणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल आज, जाहीर झाला असून ठाणे जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९५.५६ टक्के लागला आहे. जिल्ह्यातील विविध भागांतून यंदाच्या वर्षी १ लाख १३ हजार ४०३ विद्यार्थ्यांनी दहावीची परिक्षा दिली होती. त्यापैकी १ लाख आठ हजार ३७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी दहावीच्या निकालात दोन टक्क्यांनी वाढ झाली आहे.

बारावी पाठोपाठ आज, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल जाहीर झाला. ठाणे जिल्ह्याचा यंदाच्या वर्षी ९५.५६ टक्के निकाल लागला असून जिल्ह्यात यंदाही मुलींनी बाजी मारल्याचे दिसतं आहे. ठाणे जिल्ह्यातून यंदाच्या वर्षी १ लाख १३ हजार ४०३ विद्यार्थ्यांनी दहावीची परिक्षा दिली होती. त्यापैकी १ लाख आठ हजार ३७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये ५४ हजार ५९८ मुलांचा आणि ५३ हजार ७८० मुलींचा समावेश असल्याची माहिती जिल्हा माध्यमिक शिक्षण विभागाकडून देण्यात आली. जिल्ह्यात यंदाही मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण सर्वाधिक असून यंदा ९६. ७९ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर, ९४. ३९ टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. गेल्यावर्षी ठाणे जिल्ह्याचा दहावीचा निकाल हा ९३.६३ टक्के लागला होता. तर, यंदाच्या वर्षी निकालामध्ये दोन टक्क्यांनी वाढ झाली असून ९५.५६ टक्के निकाल जाहीर आहे, अशी माहिती जिल्हा माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी ललिता दहितुले यांनी दिली.

maharashtra board 12th result 2024 declare
Thane 12th Result : ठाणे जिल्ह्याचा बारावीचा निकाल ९२.०८ टक्के- यंदाही मुलींची बाजी, विज्ञान शाखेचा सर्वाधिक निकाल
Panchnama of 941 properties damaged by company explosion in Dombivli
डोंबिवलीत कंपनी स्फोटाने नुकसान झालेल्या ९४१ मालमत्तांचे पंचनामे
thane railway station crowd marathi news
ठाणे स्थानक परिसराने घेतला मोकळा श्वास
mrunal dusanis says live in america is more difficult than India
“अमेरिकेत राहणं खूप अवघड”, चार वर्षांनी भारतात आलेल्या मृणाल दुसानिसने सांगितलं परदेशातील राहणीमान, म्हणाली…
railway tracks were moved from one place to another in 8hours width of the platform will increase
ठाणे : अवघ्या आठ तासात रेल्वे रूळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, फलाटची लांबी नाही तर रुंदी वाढणार
Water supply, Thane, Water,
ठाण्यातील काही भागात बुधवारी पाणी पुरवठा बंद
Unannounced shutdown in Kalyan city due to Prime Minister Narendra Modis meeting
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेने कल्याण शहर अघोषित बंद
What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”

हेही वाचा – कल्याणमध्ये बीएमडब्ल्यूच्या बोनेटवर बसून स्टंटबाजी करणारा तरुण अटकेत

नवीमुंबई महापालिका क्षेत्राचा सर्वाधिक निकाल

नवीमुंबई महापालिका क्षेत्राचा दहावीचा निकाल ९७.४५ टक्के लागला आहे. नवीमुंबई शहारातून १५ हजार ६३६ विद्यार्थ्यांनी दहावीची परिक्षा दिली होती. यापैकी १५ हजार २३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये ७ हजार ७६६ मुलांचा तर, ७ हजार ४७२ मुलांचा समावेश आहे.

हेही वाचा – ठाण्यातील काही भागात बुधवारी पाणी पुरवठा बंद

शहर – तालुका निहाय्य निकाल (टक्केवारी नुसार)

शहर – उत्तीर्ण मुले – उत्तीर्ण मुली – एकूण

कल्याण ग्रामीण – ९५.३३ – ९७.३७ – ९६.३१

अंबरनाथ – ९५.३० – ९६.८९ – ९६.०८

भिवंडी ९३.१५ – ९५.८५ – ९४.४६

मुरबाड – ९२.५९ – ९६.३८ – ९४.४०

शहापूर – ९५.५१ – ९७.८८ – ९६.६५

ठाणे महापालिका – ९३.९५ – ९६.५३ – ९५.२१

नवी मुंबई – ९६.७८ – ९८.१६ – ९७.४५

मीरा भाईंदर – ९६.०१ – ९७.९३ – ९६.९६

कल्याण डोंबिवली – ९४.७७ – ९७.०० – ९५.८६

उल्हासनगर – ९२.७३ – ९४.९८ – ९३.८४

भिवंडी पालिका – ८९.४४ – ९४.६२ – ९२.०८

एकूण – ९४.३९ – ९६.७९ – ९५.५६