ठाणे: शिवसेनेत फुट पडल्यानंतर मी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिल्याने माझ्या मुलावर आणि माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचा गंभीर आरोप कामगार नेते तसेच धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे यांनी केला. गुरुवारी त्यांनी ठाण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी बेकायदा विहीर बांधकाम आणि पाणी चोरीप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोप फेटाळले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तोकावडे पोलीस ठाण्यात काही दिवसांपूर्वीच तलाठी संतोष पवार यांनी तक्रार दिली होती. या तक्रारीनुसार, मुरबाड येथील डोईफोडी नदीपात्रात शासनाच्या कोणत्याही विभागाची परवानगी न घेता विहीरीचे बांधकाम केल्याप्रकरणी राजन राजे यांच्या मुलगा ऋग्वेद याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर या बांधलेल्या विहिरीतून राजन राजे यांनी त्यांच्या शेतासाठी पाणी वापरल्याचे तक्रारीत म्हटले होते. त्यामुळे गुन्हा दाखल झाल्यानंतर सुमारे तीन ते चार दिवसांनी राजन राजे यांच्याही नावाचाही फिर्यादीमध्ये सामावेश करण्यात आला होता. या गुन्ह्याची माहिती देण्यासाठी राजन राजे आणि त्यांचा मुलगा ऋग्वेद यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकारपरिषदेत ठाकरे गटाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, ठाणे शहरप्रमुख प्रदीप शिंदे उपस्थित होते.

हेही वाचा >>> Maharashtra Breaking News Live : मंगलप्रभात लोढांविरुद्ध संभाजी ब्रिगेड आक्रमक; वाचा राज्यभरातील घडामोडी एका क्लिकवर

माझा मुलगा उच्चशिक्षित आहे. असे असतानाही त्याने शेती करावी यासाठी मी त्याला तिथे पाठविले होते. परंतु तेथील काही गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांनी त्याच्याविरोधात खोट्या तक्रारी दिल्या. विहिरीचे बांधकाम हे नदीपात्रात नाही. तसेच त्यासाठी आम्ही रीतसर सर्व विभागाकडून परवानगी घेतल्या होत्या. त्याच्या प्रती आमच्याकडे आहेत. ठाकरे गटाला पाठिंबा दिल्याने सुरूवातीला माझ्या मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना वाटले मी माघार घेईल. परंतु मी लढाई लढत राहिलो. त्यानंतर माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला, असा आरोप राजन राजे यांनी केला. आम्ही ही लढाई न्यायालयात लढू, असेही ते म्हणाले.

हेही वाचा >>> कल्याण-डोंबिवलीतील भूमाफियांनी शासनाचा २५०० कोटीचा महसूल बुडविला

सध्याचे राजकारण हे अत्यंत गलिच्छ पातळीवर सुरू आहे. ऋग्वेद सारख्या उच्चशिक्षित मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्यायाविरुद्ध लढणाऱ्यांविरोधात चुकीच्या पद्धतीने कारवाया केल्या जात आहेत. अशापद्धतीने कारवाया झाल्या तरीही हा लढा आम्ही यशस्वीरित्या पुढे नेणार आहोत. आम्हाला न्यायालयीन व्यवस्थेवर विश्वास आहे. सत्य परेशान हो सकत है, पर पराजित नही हो सकता. असे केदार दिघे म्हणाले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A case filed supporting the thackeray group rajan raje allegation on bjp shinde group thane news ysh
First published on: 01-12-2022 at 13:58 IST