scorecardresearch

डोंबिवलीतील आनंदप्रेम पतसंस्थेच्या तिजोरीतील सोन्यावर लिपीकाचा डल्ला

तिजोरीतील २८८ ग्रॅम १३ लाख ६२ हजार रुपये किमतीच्या सोन्यावर याच पतसंस्थेच्या एका महिला कर्मचाऱ्याने डल्ला मारल्याने खळबळ उडाली आहे.

डोंबिवलीतील आनंदप्रेम पतसंस्थेच्या तिजोरीतील सोन्यावर लिपीकाचा डल्ला
डोंबिवलीतील गोपाळनगर शाखेतील आनंद प्रेम नागरी सहकारी पतसंस्था

डोंबिवलीतील गोपाळनगर शाखेतील आनंद प्रेम नागरी सहकारी पतसंस्थेमधील १० सभासदांच्या तिजोरीतील २८८ ग्रॅम १३ लाख ६२ हजार रुपये किमतीच्या सोन्यावर याच पतसंस्थेच्या एका महिला कर्मचाऱ्याने डल्ला मारल्याने खळबळ उडाली आहे. पतसंस्था व्यवस्थापनाने याप्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

हेही वाचा >>> ठाणे स्थानकात भाजप-शिवसेनेची घोषणाबाजी

यशश्री नवनाथ शिंदे (२१, रा. काळु पाटील चाळ, किरण अपार्टमेंट जवळ, बँक ऑफ महाराष्ट्र मागे, ठाकुर्ली, डोंबिवली पू्र्व) असे आरोपी महिला लिपीकाचे नाव आहे. ती पतसंस्थेच्या गोपाळनगर शाखेत काम करते. २७ ऑगस्ट रोजी सकाळी हा प्रकार आनंदप्रेम नागरी संस्थेच्या गोपाळनगर शाखेत घडला आहे. पतसंस्थेच्या अंतर्गत चौकशीत हा प्रकार उघडकीला आला आहे.

हेही वाचा >>> उल्हासनगरात इमारतीचा काही भाग शेजारील बैठ्या घरावर कोसळून वृद्धाचा मृत्यू

पोलिसांनी सांगितले, आनंदप्रेम नागरी पतसंस्थेतील १० सभासदांनी आपल्या घरातील एकूण २८७.८०० ग्रॅम सोन्याचे दागिने गोपाळनगर पतसंस्थेत ठेव, तारण स्वरुपात ठेवले होते. पतसंस्थेत लिपिक म्हणून काम करणाऱ्या आरोपी महिला यशश्री शिंदे यांनी पतसंस्थेतील व्यवस्थापनाला काहीही कळू न देता पतसंस्थेतील तिजोरीच्या चाव्या गुपचूप ताब्यात घेतल्या. २७ ऑगस्ट रोजी सकाळी कार्यालय सुरू झाल्यावर तिजोरीतील सोन्याचे दागिने काढून घेतले. पतसंस्थेचे व्यवस्थापक गजानन रामचंद्र बोबडे यांच्या हा नंतर प्रकार निदर्शनास आला. पतसंस्था कार्यालयाचा कडीकोयंडा सुरक्षित असताना, कोठेही चोरीचे धागेदोरे दिसत नसताना दागिने चोरीला गेले कसे याचा तपास पतसंस्था व्यवस्थापनाने सुरू केला. या अंतर्गत चौकशीत लिपीक यशश्रीने हे दागिने चोरले असल्याची खात्री पटल्यावर व्यवस्थापक गजानन बोबडे यांनी यशश्री विरुध्द चोरीचा तक्रार टिळकनगर पोलीस ठाण्यात केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: A clerk stole gold from the vault of anandprem credit union in dombivli amy