A doctor assaulted a medical professional in Dombivli news seriously injured crime police ysh 95 | Loksatta

डोंबिवलीत डॉक्टरची वैद्यकीय व्यावसायिकाला मारहाण

गाळ्याच्या अनामत रकमेवरुन दोघांमध्ये भांडण झाल्याने हा प्रकार घडला आहे, असे मानपाडा पोलिसांनी सांगितले.

डोंबिवलीत डॉक्टरची वैद्यकीय व्यावसायिकाला मारहाण
लोकसत्ता ग्राफिक्स टीम

डोंबिवली: डोंबिवलीत एका डॉक्टरने एका वैद्यकीय व्यावसायिकाला मारहाण केली आहे. व्यावसायिकाच्या डोक्यात लोखंडी सळईने वार केल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. गाळ्याच्या अनामत रकमेवरुन दोघांमध्ये भांडण झाल्याने हा प्रकार घडला आहे, असे मानपाडा पोलिसांनी सांगितले.

डोंबिवली जवळील २७ गावातील उंबार्ली रस्त्यावर डाॅ. पाटील यांचा दवाखाना आहे. या दवाखान्यात हा प्रकार घडला आहे. मोहम्मद हुसेन जैरुद्दिन अन्सारी (२४) असे औषध विक्रेत्याचे नाव आहे. डॉक्टर पाटील यांचा मानपाडा भागात दुकानाचा गाळा आहे. हा गाळा अन्सारीने वैद्यकीय व्यवसायासाठी भाड्याने घेण्याचे ठरविले होते. या बदल्यात डाॅ. पाटील यांना अन्सारीने पाच हजार रुपये अनामत रक्कम दिली होती. अनामत रक्कम देऊनही डाॅ. पाटील यांनी अन्सारी यांना काहीही न सांगता त्यांचा गाळा अन्य एका भाडेकरुला व्यवसायासाठी दिला. आपणास गाळा भाड्याने द्यायचा नसल्याने यापूर्वी दिलेले पाच हजार रुपये परत करा म्हणून अन्सारीने पाटील यांच्याकडे तगादा लावला होता. सतत फेऱ्या मारुनही पैसे परत मिळत नसल्याने अन्सारी त्रासला होता.

हेही वाचा >>> टिटवाळा रेल्वे स्थानकात लोकलच्या डब्यात महिलेची प्रसूती

बुधवारी अन्सारी आणि त्याचा मित्र डाॅ. पाटील यांच्या दवाखान्यात अनामत रक्कम परत मागण्यासाठी गेले होते. त्यावेळी पाटील आणि अन्सारी यांच्यात बाचाबाची झाली. डाॅ. पाटील यांनी अनामत रक्कम परत करण्यास नकार दिला. अन्सारी यांना दवाखान्यातून जाण्यास सांगितले. यावेळी पाटील यांनी दवाखान्यातील लोखंडी सळईचा वार अन्सारी यांच्या डोक्यात केला. ते रक्तबंबाळ झाले. अन्सारी यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. साहाय्यक पोलीस निरीक्षक एम. डी. जोशी तपास करत आहेत.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-12-2022 at 16:35 IST
Next Story
ठाणे: शहापूर तालुक्यातील गावांना भूकंपाचे सौम्य धक्के; घराला तडे गेल्यामुळे नागरिकांवर तंबूत राहण्याची वेळ