scorecardresearch

Premium

ठाणे, मुंबई जिल्ह्यात १०० गुन्हे केलेला ‘मोक्का’तील फरार इराणी गुंड अटकेत

ठाणे, मुंबई जिल्ह्याच्या विविध भागांत घरफोड्या, लुटमार, दहशतीचा अवलंब करून कायदा सुव्यवस्था बिघडविणारा आंबिवली इराणी वस्तीमधील एका खतरनाक गुंडाला खडकपाडा पोलिसांनी अटक केली.

fugitive Irani gangster
मोक्कातील खतरनाक गुन्हेगाराला पोलिसांकडून अटक. (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

कल्याण – ठाणे, मुंबई जिल्ह्याच्या विविध भागांत घरफोड्या, लुटमार, दहशतीचा अवलंब करून कायदा सुव्यवस्था बिघडविणारा आंबिवली इराणी वस्तीमधील एका खतरनाक गुंडाला खडकपाडा पोलिसांनी कर्नाटक राज्यातील धारवाड जिल्ह्यातील अलनवर गावातून शुक्रवारी शिताफीने अटक केली.

कासीम मुख्तार इराणी उर्फ तल्लफ (२४) असे गुंडाचे नाव आहे. त्याच्यावर ठाणे, मुंबई जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात १०० हून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. संघटित गुन्हेगारी कायद्याने कासीमवर कारवाई करण्यात आली आहे. ३० गुन्ह्यांमध्ये त्याला फरार म्हणून घोषित करण्यात आले होते. काही वर्षांपासून पोलीस त्याचा माग काढत होते.

955 rare species tortoise puppies seized
डीआरआय’ची कारवाई : दुर्मीळ प्रजातीच्या कासवांची ९५५ पिल्ले ताब्यात
cm Eknath Shinde in cleanliness campaign in mumbai
स्वच्छतेचा जागर! राज्यात ७२ हजारांपेक्षा जास्त ठिकाणी स्वच्छता मोहीम
Agriculture Minister Dhananjay Munde
पूर ओसरला, पुनर्वसन मंत्र्यांनंतर आता कृषी मंत्री नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर
Leopards in Dighati Chirner forest on Uran Panvel border
उरण – पनवेल सीमेवरील दिघाटी – चिरनेर जंगलात बिबट्या ? रहिवाशांची धास्ती वाढली

हेही वाचा – ठाणे : अधिकारी, ठेकेदारांच्या आर्थिक लागेबांधेमुळे रस्ते खड्ड्यात, आमदार संजय केळकर यांचा गंभीर आरोप

लपून असला तरी कासीमच्या छुप्या कारवाया सुरूच होत्या. त्यामुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते. कोणत्याही परिस्थितीत कासीमला पकडण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले होते. कासीम धारवाड जिल्ह्यातील एका गावात लपून बसला आहे अशी माहिती खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना मिळाली. उपायुक्त सचिन गुंजाळ, वरिष्ठ निरीक्षक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरद झिने, नंदकुमार केंचे, साहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड, हवालदार मधुकर दाभाडे, अशोक पवार, जितेंद्र ठोके, संजय चव्हाण, नवनाथ डोंगरे, जितेंद्र सरदार, संजय चव्हाण, राजू लोखंडे, संदीप भोईर, योगेश बुधकर, सुधीर पाटील, राहुल शिंदे, नवनाथ बोडके, अनंत देसले, कुंदन भांबरे, अविनाश पाटील याचे पथक शुक्रवारी सकाळी कर्नाटकमधील धारवाड जिल्ह्यात दाखल झाले.

पोलिसांनी कासीम राहत असलेल्या अलनवार गावाला वेढा घातला. त्याचा गावातील घराघरात जाऊन शोध सुरू केला. आपणास पोलिसांनी घेरले असल्याची कुणकुण लागताच कासीमने तो लपून बसलेल्या घराची कौले काढून पळून जाण्याचा प्रयत्न केला. गावाच्या चहूबाजूने वेढा टाकलेल्या पोलिसांनी कासीमचा पाठलाग करून त्याला गावाच्या हद्दीत जेरबंद केले. या झटापटीत एक पोलीस जखमी झाला. कल्याणजवळील आंबिवलीमधील पाटीलनगरमधील इराणी वस्तीत कासीम राहतो. त्याच्याकडून पाच दुचाकी, एक पिस्तुल हस्तगत करण्यात आले आहे.

हेही वाचा – डोंबिवली: एटीएम सेवेतील कामगारांनी चोरली १३ लाखाची रक्कम

कासीमच्या अटकेने मुंबई, ठाणे जिल्ह्यातील अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली. अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, उपायुक्त सचिन गुंजाळ, साहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांनी खडकपाडा पोलिसांचे कौतुक केले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: A fugitive irani gangster who committed 100 crimes in thane mumbai district has been arrested ssb

First published on: 12-07-2023 at 12:19 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×