ठाणे – मुंब्रा येथील अमृतनगर भागात मंगळवारी दुपारी रस्त्यावरून एक चार वर्षाची बालिका आईसोबत जात असताना तिच्या अंगावर परिसरातील एका इमारतीवरून पाळीव श्वान पडला. या अपघातात जखमी झालेल्या बालिकेचा उपचारादरम्यान मृत्यु झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. तसेच जखमी झालेल्या श्वानावर उपचार सुरू आहेत. या अपघातप्रकरणी मुंब्रा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

सना बानो असे या अपघातात मृत पावलेल्या बालिकेचे नाव असून ती मुंब्य्रातील अमृतनगर भागात राहत होती. ती मंगळवारी दुपारी ४.३० वाजता अमृतनगर भागातील रस्त्यावरून आईसोबत जात होती. त्यावेळेस चिराग मेन्शन या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरुन एक पाळीव श्वान खाली पडला. तो खाली पडत असताना सना हिच्या अंगावर पडला. त्यात डोक्याला मार लागल्याने ती गंभीर जखमी झाली. स्थानिक नागरिकांनी तिला कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी नेले. तिथे ईसीजी काढून ती मृत झाल्याचे घोषित केले. या अपघातात श्वानही जखमी झाला असून त्याला प्राणी मित्रांनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या विचित्र अपघातात बालिकेला आपला प्राण गमवावा लागल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या अपघातप्रकरणी मुंब्रा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

Clash between two groups in Sambarewadi near Sinhagad youth killed in firing
सिंहगडाजवळील सांबरेवाडीत दोन गटात हाणामारी, गोळीबारात तरुणाचा मृत्यू; एक जण गंभीर जखमी
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
accident in chhatrapati sambhaji nagar
छ. संभाजी नगरमधील भीषण अपघात; दीड महिन्याच्या बाळासह कुटुंबातील चौघांचा मृत्यू; बारसं करून पुण्याला जाताना घडला अपघात
Massive fire in building in Ghatkopar Mumbai
घाटकोपरमधील इमारतीला भीषण आग, १३ जण गुदमरले; रुग्णालयात उपचार सुरू
Dombivli, Thakurli, laborer robbed Thakurli,
डोंबिवली : ठाकुर्लीतील ९० फुटी रस्त्यावर चाकूचा धाक दाखवून मजुराला लुटले
lokjagar article marathi news
लोकजागर: अवघी विघ्ने नेसी विलया…
Bike accident while returning from Ganeshotsav shopping in vasai
गणेशोत्सवाची खरेदी करून परताना दुचाकीचा अपघात, चांदीप येथील घटना ; बारा वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
dumper and car accident on solapur road
सोलापूर रस्त्यावर डंपरची मोटारीला धडक; पिता-पुत्राचा मृत्यू, एकाच कुटुंबातील तिघे गंभीर जखमी

हेही वाचा >>>कल्याणमध्ये मोटार चालकाचा दुचाकी स्वाराला ठार मारण्याचा प्रयत्न

पाळीव श्वान अंगावर पडून बालिकेचा मृत्यु झाला आहे. याप्रकरणी तिच्या आईचा सविस्तर जबाब घेण्यात आला असून तिच्या आईने कोणाविरुद्धही तक्रार किंवा संशय व्यक्त केलेला नाही. तसेच या पाळीव श्वानाच्या मालकाने महापालिकेकडून श्वान पाळणे बाबतच्या परवानगी घेतली आहे किंवा नाही, याच्या चौकशीसाठी पालिकेकडे पत्रव्यवहार करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती मुंब्रा पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांनी दिली.