ठाणे : वृद्धेचा गळा आवळून सोनसाखळी चोरी

वृद्धेचा गळा आवळून तिच्या गळ्यातील सोनसाखळी चोरी केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे.

ठाणे : वृद्धेचा गळा आवळून सोनसाखळी चोरी
( संग्रहित छायचित्र )

वृद्धेचा गळा आवळून तिच्या गळ्यातील सोनसाखळी चोरी केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

कोपरी येथे ७४ वर्षीय महिला वास्तव्यास आहे. शुक्रवारी सायंकाळी ४:३० वाजेच्या सुमारास त्या कोपरी येथील आनंदभारती रस्त्यावरून पायी जात होत्या. त्याचवेळी मागून आलेल्या दोन चोरट्यांपैकी एकाने त्यांच्या खांद्यावर थाप मारून त्यांचा गळा आवळला. तर दुसऱ्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील ११ ग्रॅम वजनाची सोनसाखळी चोरी केली. त्यानंतर दोघेही चोरटे पळून गेले. वृद्धेने आरडाओरड केली. परंतु रस्त्यावर कोणीही नव्हते. या घटनेप्रकरणी वृद्धेने कोपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याआधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: A gold chain was stolen by strangulating an old woman neck amy

Next Story
विश्लेषण: उद्धव सेनेशी संघर्षातूनच बालेकिल्ल्याला प्रकल्प रसद? मुख्यमंत्र्यांची ठाणे जिल्ह्यावर का दिसते विशेष मर्जी?
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी