कल्याण : कल्याण शहराच्या पूर्व भागातील कोळसेवाडी परिसरात चिंचपाडा रोड येथील अनुग्रह टावर या इमारतीत बिबट्या शिरल्याची खळबळ घटना समोर आली आहे. वनविभागाचे कर्मचारी, पोलीस घटनास्थळी पोहोचले असून बिबट्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा… भिवंडी ते इमारतीत बांधकामाचे उद्वाहक कोसळून दोन कामगारांचा मृत्यू

कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी हा परिसर तसा दाट लोकवस्तीचा आहे. मात्र शेजारीच हाजी मलंग चा विस्तीर्ण घनदाट जंगलाचा डोंगर भाग आहे. या भागातून हा बिबट्या आला असण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. मात्र बिबट्याच्या प्रवेशाने कल्याण पूर्व भागात भीतीचे वातावरण आहे. काही वर्षांपूर्वी लोकसंख्येची दाट घनता असलेल्या उल्हासनगर शहरात गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी एका घरात बिबट्या शिरला होता. त्यानंतरची शहरी भागात बिबट्या येण्याची ही दुसरी घटना आह. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाचे प्रयत्न सुरू आहेत.

हेही वाचा… डोंबिवलीत बेकायदा इमारत घोटाळ्यातील पाच भूमाफियांना अटक

बिबट्याला सध्या एका ठिकाणी स्थानबद्ध करण्यात आले असून इमारतीतील सर्व रहिवाशांना दारे खिडक्या बंद करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुख्यालयातून वन विभागाचे पथक दाखल होतात बिबट्याला जेर बंद केले जाईल, अशी माहिती कल्याणचे वनक्षेत्रपाल संजय चन्ने यांनी दिली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A leopard entered the building in kolsewadi kalyan east asj
First published on: 24-11-2022 at 10:35 IST