ठाण्यातील माजिवाडा उड्डाणपूलाखाली उभ्या असलेल्या मिनी बसला आग

अग्निशमन दलाचे एक वाहन घटनास्थळी दाखल

ठाण्यातील माजिवाडा उड्डाणपूलाखाली उभ्या असलेल्या भंगारातील एका मिनी बसला (एमएच ४६ ई ८८६) आग लागल्याची घटना घडल्याचे समोर आले आहे.

माजिवाडा उड्डाणपूलाखाली आझाद टिंबर ट्रेडर्स माजिवाडा, ठाणे (प.) समोर ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. याबाबत कापूरबावडी पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरडीएमसी आणि अग्निशमन दलाचे एक वाहन फायर इंजिनसह घटनास्थळी दाखल झाले आहे.

सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही किंवा कुणाला दुखापतही झालेली नाही. परिस्थिती नियंत्रणात असल्याची देखील माहिती मिळाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: A mini bus parked under the majiwada flyover in thane caught fire msr

Next Story
ठाणे ग्रामीण भागातील ३१ बोगस डॉक्टरांवर गुन्हे
फोटो गॅलरी