scorecardresearch

Premium

कल्याणमधील मायलेकांच्या हत्येमागचे नवे कारण समोर; प्रेमसंबंध आणि कर्जामुळे हत्या केल्याचा मृत महिलेच्या भावाचा आरोप

या प्रकरणात पोलिसांनी दीपक गायकवाड याच्या विरूध्द गुन्हा दाखल करून त्याला संभाजीनगर येथून अटक केली.

new reason killing wife son Kalyan Dead woman's brother accused murder love affair debt
कल्याणमधील मायलेकांच्या हत्येमागचे नवे कारण समोर; प्रेमसंबंध आणि कर्जामुळे हत्या केल्याचा मृत महिलेच्या भावाचा आरोप (छायाचित्र- लोकसत्ता टीम)

कल्याण: कल्याण येथील रामबाग परिसरात राहणाऱ्या अश्विनी गायकवाड आणि त्यांचा सात वर्षीय मुलगा आदिराज या दोघांच्या हत्येचे नवे कारण आता समोर आले आहे. तिचा पती दिपक गायकवाड याने कार्यालयातील महिलेशी असलेले प्रेमसंबंध आणि कर्ज बाजारीपणाला कंटाळुन हे हत्याकांड केल्याचा आरोप मृत महिलेच्या भावाने केला असून या संदर्भात त्याने दिलेल्या तक्रारीच्या आधारे महात्मा फुले पोलीसांनी तपास सुरू केला आहे.

गेल्या शुक्रवारी कल्याण मधील रामबाग भागात राहणाऱ्या दीपक गायकवाड याने पत्नी अश्विनी गायकवाड (३२), मुलगा आदिराज (७) यांची राहत्या घरात उशीने तोंड दाबून हत्या केली होती. या प्रकरणात पोलिसांनी दीपक गायकवाड याच्या विरूध्द गुन्हा दाखल करून त्याला संभाजीनगर येथून अटक केली. तो आता पोलीस कोठडीत आहे. मयत महिलेचा भाऊ विकेश मोरे (३०) यांनी या हत्येप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. सात वर्षापूर्वी आरोपी दीपक हा पुणे येथे नोकरीला होता. त्याने तेथील नोकरी सोडली. त्याने शेअर बाजारात गुंतवणूक करणे सुरू केले होते.

chandrapur crime news, son killed mother, son killed mother with axe marathi news
चंद्रपूर : पोटच्या गोळ्यानेच आईला संपवले, कुऱ्हाडीने केली हत्या; वडील जखमी
love triangle nagpur
‘पती, पत्नी और वो…’ प्रेमाच्या त्रिकोणातून दोन संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर; भरोसा सेलने…
akola crime news, father killed his son akola marathi news
धक्कादायक! दलित मुलीवर प्रेम केल्याने वडिलांनी मुलाला संपवले; बनाव रचला, पण पोलीस तपासात…
prison rape 15 year girl
आईच्या प्रियकराचा मुलीवरही बलात्कार

हेही वाचा… कल्याणमधील दुहेरी हत्याकांडातील आरोपी संभाजीनगर मधून अटक

अर्थविषयक ज्ञान असल्याने त्याने निधी रिसर्च फर्म नावाची गुंतवणूक कंपनी स्थापन केली होती. लोकांना वाढीव व्याजाचे आमिष दाखवून दीपक या कंपनीत गुंतवणूक करत होता. रामबाग गल्ली क्रमांक चार मध्ये दीपकने लहान मुलांच्या खेळण्याचे दुकान सुरू केले होते. गांंधारे येथे शाळा सुरू केली होती. या सगळ्या व्यवहारांमुळे दीपक कर्जबाजारी झाला होता. आर्थिक विवंचनेतून तो पत्नी अश्विनीला सारखा माहेरहून पैसे आणायला सांगायचा. त्याला आतापर्यंत पाच लाख रूपये दिले आहेत. तरीही तो तिला सारखा मारहाण करत असे. ही प्रकरणे सुरू असतानाच दीपकचे त्याच्या कार्यालयातील एका महिलेशी प्रेमसंबंध होते. हा विषय सहा महिन्यापूर्वी बहिण अश्विनीला समजला होता. तिने पती दीपकला त्या महिलेबरोबरचे संबंध तोडण्याचे सांगितले होते. याऊलट या विषयात पत्नी हस्तक्षेप करते म्हणून दीपक पत्नीला मारहाण करत होता, असे विकेश मोरे यांनी तक्रारीत म्हटले आहे. कर्जबाजारीपणा आणि कार्यालयातील महिलेशी असलेल्या प्रेम संबंधातून हा सगळा प्रकार घडल्याचे त्याने तक्रारी म्हटले आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: A new reason behind the killing of wife and son in kalyan dead womans brother accused of murder due to love affair and debt dvr

First published on: 04-12-2023 at 17:16 IST

आजचा ई-पेपर : ठाणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×