scorecardresearch

टिटवाळ्याजवळ दीड वर्षाच्या मुलाला भरधाव टेम्पोने चिरडले; सुदैवाने अन्य तीन मुलं थोडक्यात वाचली

टेम्पो चालकास अटक करण्यात आली असून न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे

मैदानात खेळत असलेल्या चार ते पाच मुलांच्या अंगावर एका टेम्पो चालकाने भरधाव वेगातील टेम्पो नेला. यामध्ये तीन मुलं टेम्पो अंगावर येताना पाहून क्षणार्धात बाजुला झाल्याने थोडक्यात वाचली, मात्र त्यांच्यातीलच एक दीड वर्षाचा मुलगा बाजुला होण्याच्या प्रयत्नात असतानाच त्याला टेम्पोने चिरडले. टिटवाळ्या जवळील बल्याणी-आंबिवली रस्त्यावर हा भयानक प्रकार घडला आहे. टेम्पो चालकाच्या या संतापजनक प्रकाराबद्दल बल्याणी, आंबिवली परिसरातील नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

टिटवाळा पोलीस ठाण्यात याप्रकरणी मुलाचे नातेवाईक सोहन शहा यांनी गुन्हा दाखल केला आहे. टेम्पो चालक सईद फारूखी याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबिवली बल्याणी रस्त्यावर एका मंदिराच्या बाजुला रहिम चाळीच्या जवळ प्रशस्त पटांगण आहे. बल्याणी परिसरातील मुले सकाळ, संध्याकाळ या भागात खेळत असतात. मंगळवारी दुपारी सईद फारूखी हा भरधाव वेगाने टेम्पो घेऊन या भागातील एका दुकानात बांधकामाचे साहित्य घेण्यासाठी चालला होता. तो रस्त्याने निघून जाईल असे खेळत असलेल्या मुलांना वाटले. मात्र भरधाव टेम्पो मैदानात आपल्याच दिशेने येत असल्याचे पाहून, मुले घाबरून तिथून पळाली. यामध्ये तीन मुले थोडक्यात वाचली. मात्र त्यांच्यातील अरजमान शहा याला टेम्पोने जोराची धडक दिली व चालकाने त्याच्या अंगावरून टेम्पो नेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: A one and a half year old boy was crushed by a tempo near titwala luckily the other three boys survived briefly msr

ताज्या बातम्या