स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येतं आहे. या अंतर्गत ठाणे जिल्ह्यातून १५ ऑगस्ट रोजी सुमारे २०० पाळीव श्र्वानांची परेड काढण्यात येणार आहे. डॉग्ज वर्ल्ड आणि पापा पॉसम यांच्या वतीने या ‘ डॉग्ज परेड ‘ चे आयोजन करण्यात आले आहेत. या परेड मध्ये सहभागी होणाऱ्या ठाणे शहरातील सुमारे २०० पाळीव श्र्वानांना ‘स्वातंत्र्याची ७५ वर्ष’ असा लोगो असलेले टीशर्ट घालण्यात येणार आहे. तर या श्र्वांनाचे मालक हाती राष्ट्रध्वज घेऊन यात सहभागी होणार आहे. ही परेड १५ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता ठाण्यातील डॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृह ते केवरा सर्कल या मार्गे निघणार आहे.

देशातील सर्व राज्यांमध्ये यंदा स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या अंतर्गत ठाणे जिल्हा प्रशासनातर्फे अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे तसेच मॅरेथॉन, शालेय विद्यार्थ्यांच्या प्रभातफेऱ्या स्वातंत्र्यविरांचे माहिती प्रदर्शन, ऐतिहासिक स्थळांचे सुशोभीकरण, विविध मान्यवरांच्या मुलाखती यांसारख्या नानाविविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच घरोघरी तिरंगा मोहीम देखील जिल्ह्यात जोमाने राबविण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. या कार्यक्रमांमध्ये डॉग्ज वर्ल्ड आणि पापा पॉसम यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘ डॉग्ज परेड ‘ या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ही परेड स्वातंत्र्य दिनी सर्व ठाणेकरांचे लक्ष वेधून घेणारी ठरणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.

Rashmi Thackeray in Thane for Chaitra Navratri festival
ठाण्यात चैत्र नवरात्रौत्सवासाठी रश्मी ठाकरे उपस्थिती… ठाकरे गटाचे शक्तीप्रदर्शन
piyush goyal
कर्तबगारीने ‘तेजांकित’ झालेल्यांचा गौरव!
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान
piyush goyal
लखलखत्या तरुण तेजांकितांचा आज गौरव; केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियूष गोयल प्रमुख अतिथी

‘ डॉग्ज परेड ‘ मध्ये होणार काय ?
या परेड मध्ये सुमारे २०० पाळीव श्वानांची फेरी निघणार आहे. यात सहभागी होणाऱ्या श्वानांना ‘स्वातंत्र्याची ७५ वर्ष’ आणि उत्सव ७५ ठाणे असा लोगो असलेलं टीशर्ट घालण्यात येणार आहे. तर या श्र्वानांचे मालक हाती तिरंगा घेऊन या फेरीत सहभागी होणार आहे. तसेच पाळीव प्राण्यांना विष्ठा करण्याकरिता रस्त्यावर आणु नये या बाबत जनजागृती करण्यात येणार असल्याचे डॉग्ज वर्ल्डचे प्रमोद निंबाळकर यांनी सांगितले आहे.