scorecardresearch

ठाण्यात धर्मप्रचार करण्यास गेलेल्या पास्टरला मारहाण

प्रवचन करून झाल्यानंतर ते वाशी येथे परतत असताना काहीजणांनी त्यांना अडवून पट्ट्याने मारहाण केली.

ठाण्यात धर्मप्रचार करण्यास गेलेल्या पास्टरला मारहाण
( संग्रहित छायचित्र )

ठाणे : भिवंडी येथील पिलानीपाडा भागात धर्मप्रचार करून घरी परतणाऱ्या ख्रिस्ती धर्मातील पास्टर सुजित चिकोली आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मारहाण करण्यात आली. याप्रकरणी रविवारी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चिकोली हे त्यांच्या सहकाऱ्यांसह पिलानीपाडा येथील काटई परिसरात एका व्यक्तीच्या घरी धर्मप्रचार करण्यासाठी प्रवचनास गेले होते.

प्रवचन करून झाल्यानंतर ते वाशी येथे परतत असताना काहीजणांनी त्यांना अडवून पट्ट्याने मारहाण केली. याप्रकरणी रविवारी त्यांच्या सहकाऱ्याने भिवंडी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्याआधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या