ठाण्यात मुले पळविणाऱ्या टोळीच्या अफवेतून एकाला बेदम मारहाण | A person was brutally beaten up Thane due to rumors of gang of abducting children diwa thane | Loksatta

ठाण्यात मुले पळविणाऱ्या टोळीच्या अफवेतून एकाला बेदम मारहाण

शहरात मुले पळविणारी टोळी फिरत असल्याची अफवा पसरत असून नागरिकांनी या अफवेवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

ठाण्यात मुले पळविणाऱ्या टोळीच्या अफवेतून एकाला बेदम मारहाण
प्रातिनिधिक छायाचित्र

ठाणे : दिवा येथे मुले पळविणाऱ्या टोळीच्या अफवेतून एकाला बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला आहे. याप्रकरणी तरुणाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे चार जणांविरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिवा येथील मुंब्रा काॅलनी परिसरातून एक तरूण जात होता. त्याचवेळी एक टेम्पो आला. धडक बसू नये म्हणून तरुण मागे आला असता, त्याचा धक्का एका लहान मुलीला बसला. तो तरूण त्या मुलीला उचलण्यासाठी गेला असता, जवामाने त्याला मुले चोरणाऱ्या टोळीतील असल्याच्या अफवेतून बेदम मारहाण केली.

या घटनेची माहिती मुंब्रा पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तरुणाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. काही दिवसांपूर्वी असाच काहीसा प्रकार कळवा येथील विटावा भागात घडला होता. या घटनेत एका महिलेला जमावाने बेदम मारहाण केली होती. शहरात मुले पळविणारी टोळी फिरत असल्याची अफवा पसरत असून नागरिकांनी या अफवेवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
संधी आणि आव्हानांची सांगड घालून ठाणे शहराच्या समस्या सोडविणार, नवनिर्वाचित ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांचे प्रतिपादन

संबंधित बातम्या

ठाणे: कोपरी पूलाच्या तुळई बसविण्याचे काम पूर्ण; आता पुन्हा वाहतूक बदलाची आवश्यकता नाही
टीम ओमी कलानी राष्ट्रवादीतच!
शिवसेनेच्या मोर्चामुळे शहरात कोंडी
आताचे सरकार भाजपची कळसूत्री बाहुली – आमदार भास्कर जाधव
डोबिंवली: शीळ रस्त्यावरील दुभाजकामध्ये रस्ता ठेवण्यास ‘एमएसआरडीसी’चा नकार?, परिसरातील नागरिकांमध्ये नाराजी

व्हिडिओ

ताज्या बातम्या
“महाराष्ट्राच्या दोन मंत्र्यांनी बेळगावला येणं अनुकूल नाही”, कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मईंचा इशारा
पोलीस उपनिरीक्षक विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेची निवड यादी जाहीर; यंदा डिजिटल तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शारीरिक चाचणी
‘मुंबईतील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाच्या निर्णयाला जाणीवपूर्वक उशीर’; शिवसेना खासदार अरविंद सावंत यांचा आरोप
विजय दिवस सोहळ्यात यंदा भरगच्च कार्यक्रम; रौप्यमहोत्सवानिमित्त संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, शरद पवार यांना निमंत्रण
FIFA WC 2022: मोक्याच्या क्षणी ह्वांग ही चॅन चा गोल! द. कोरिया बाद फेरीत दाखल, मात्र जिंकूनही उरुग्वे विश्वचषकातून बाहेर