ठाणे : दिवा येथे मुले पळविणाऱ्या टोळीच्या अफवेतून एकाला बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला आहे. याप्रकरणी तरुणाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे चार जणांविरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिवा येथील मुंब्रा काॅलनी परिसरातून एक तरूण जात होता. त्याचवेळी एक टेम्पो आला. धडक बसू नये म्हणून तरुण मागे आला असता, त्याचा धक्का एका लहान मुलीला बसला. तो तरूण त्या मुलीला उचलण्यासाठी गेला असता, जवामाने त्याला मुले चोरणाऱ्या टोळीतील असल्याच्या अफवेतून बेदम मारहाण केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या घटनेची माहिती मुंब्रा पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तरुणाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. काही दिवसांपूर्वी असाच काहीसा प्रकार कळवा येथील विटावा भागात घडला होता. या घटनेत एका महिलेला जमावाने बेदम मारहाण केली होती. शहरात मुले पळविणारी टोळी फिरत असल्याची अफवा पसरत असून नागरिकांनी या अफवेवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A person was brutally beaten up thane due to rumors of gang of abducting children diwa thane tmb 01
First published on: 30-09-2022 at 18:14 IST