scorecardresearch

ठाणे: दारु पिण्यावरुन कारणावरून एकाची हत्या

दारु पिण्याच्या कारणावरून वर्तकनगर भागात एकाची चाकूने वार करुन हत्या करण्यात आल्याचा प्रकार गुरुवारी रात्री उघडकीस आला आहे.

ठाणे: दारु पिण्यावरुन कारणावरून एकाची हत्या
संग्रहित छायाचित्र / लोकसत्ता

दारु पिण्याच्या कारणावरून वर्तकनगर भागात एकाची चाकूने वार करुन हत्या करण्यात आल्याचा प्रकार गुरुवारी रात्री उघडकीस आला आहे. दिपक निरभवणे असे मृताचे नाव असून याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात वर्तकनगर पोलिसांनी पाचजणांना ताब्यात घेऊन अटक केली आहे.

हेही वाचा >>>कल्याण: नागरी समस्यांवरुन कल्याण डोंबिवली पालिकेसमोर जागरुक नागरिकांची धरणे आंदोलने

जगदीश नरहिरे, वैभव जगताप, अजय धोत्रे, राकेश हागरगी, प्रदीप चव्हाण अशी आरोपींची नावे आहेत. वर्तकनगर येथील भिमनगर परिसरात हा प्रकार उघडकीस आला. सुमारे १५ ते २० दिवसांपूर्वी दिपक निरभवणे, प्रशांत निरभवणे, त्यांचा मावस भाऊ विलास पवार यांचे याच परिसरात राहणाऱ्या जगदीश, वैभव, अजय, राकेश, प्रदीप यांच्यासोबत दारु पिण्याच्या कारणावरुन वाद झाले होते. बुधवारी रात्री भिमनगर येथील साईनाथनगर परिसरात दिपक, प्रशांत आणि विलास हे बोलत असताना जगदीश, वैभव आणि राकेश यांनी त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. या वादाचे पर्यवसन हाणामारीत झाले. त्यावेळी जगदीशने त्याच्याजवळील चाकूने दिपकच्या छातीत वार केले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर जगदीशने विलास आणि प्रशांतवरही चाकूने हल्ला करून त्यांना सळईने मारहाण करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या मारहाणीत जगदीशही जखमी झाला. प्रशांत आणि विलासला उपचारासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर जगदीशला जिल्हा शासकी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यानंतर याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणात पोलिसांनी पाचही जणांना अटक केली असून प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-12-2022 at 16:42 IST

संबंधित बातम्या