डोंबिवली पूर्वेतील गोपाळनगर भागात शुक्रवारी पहाटे तीन अनोळखी इसमांनी दोन रहिवाशांना बंदुकीचा धाक दाखवून बेदम मारहाण केली. मारहाण झालेल्या मध्ये एका छायाचित्रकाराचा समावेश आहे. भरत विठ्ठल खानापुरे (३८, रा. साकार रेसिडेन्सी, गोग्रासवाडी, डोंबिवली पूर्व) असे तक्रारदार छायाचित्रकाराचे नाव आहे.

हेही वाचा- ठाणे : डोंबिवलीत एकाच रात्री दोन सराफा दुकानांत चोरी, लाखो रुपयांचा सोने-चांदीचा ऐवज लंपास

The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
Police raid on Dancers obscene dance in bungalow at lonawala
लोणावळा: बंगल्यात सुरू होता नृत्यांगनाचा अश्लील नाच; पोलिसांनी टाकला छापा
baba kalyani
अग्रलेख: तीन पिढय़ांचा तमाशा!
non marathi mobile phone professionals
अमराठी भ्रमणध्वनी व्यावसायिकांना समज, दुरुस्ती काम न करण्याचा मनसेचा इशारा

छायाचित्रकार भरत हे आपला मित्र शुभम बरोबर शुक्रवारी पहाटे अडीच वाजताच्या दरम्यान गोपाळनगर गल्ली क्रमांक एकमध्ये कैलासधाम सोसायटी समोर गप्पा मारत उभे होते. त्यावेळी कमरेला बंदूक लावलेला एक इसम भरत खानापुरे यांच्या जवळ आला. त्याने तुम्ही येथे थांबायचे नाही. येथून निघून जा, असे सांगितले. आम्ही येथून निघणार नाही असे भरत खानापुरे आणि त्याच्या मित्राने बोलताच इसमाने जवळील बंदुकीचा धाक दाखवून मारण्याची धमकी दिली. त्याचवेळी समोरुन एक इर्टिंगा वाहन आले. ते वाहन भरत यांच्या समोर येऊन उभे राहिले. त्या वाहनातून दोन इसम उतरले. त्यांनी भरत यांच्या हातामधील मोबाईल हिसकावून जमिनीवर आपटला. आणि भरत यांना हाताने बेदम मारहाण करत त्यांच्या डोक्यात पेव्हर ब्लाॅकसारखी वस्तू मारुन दुखापत केली. तीन जणांकडून जीवाचे बरेवाईट होण्यापेक्षा भरत यांनी तेथून निघून रामनगर पोलीस ठाणे गाठले. टिळकनगर पोलीस ठाण्यात भरत खानापुरे यांनी तक्रार केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे.