ठाण्यात आज मुख्यमंत्र्यांचा होणार सत्कार ; निवसस्थानापासून ते घाणेकर नाट्यगृहपर्यंत निघणार मिरवणूक

ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृहात सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे

ठाण्यात आज मुख्यमंत्र्यांचा होणार सत्कार ; निवसस्थानापासून ते घाणेकर नाट्यगृहपर्यंत निघणार मिरवणूक
( मुख्यमंत्री एकनाथ शिंदे )

ठाणे जिल्ह्याला एकनाथ शिंदे यांच्या रूपाने मुख्यमंत्रीपदाचा बहुमान मिळाला असून यानिमित्ताने ठाण्यातील विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असणाऱ्या सेवाभावी संस्थांतर्फे शिंदे यांचा आज, शनिवारी सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमापूर्वी शिंदे यांच्या नितीन कंपनी येथील निवासस्थानापासून कार्यक्रमस्थळापर्यंत त्यांच्या मिरवणुकीचेही आयोजन करण्यात आले आहे.

ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृहात सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमात ठाण्यातील कला, क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, वैद्यकीय, औद्योगिक आदी विविध क्षेत्रांतील दीडशेहून अधिक संस्थांच्या पुढाकाराने शिंदे यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, त्र्यंबकेश्वरच्या अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे पिठाधीश अण्णासाहेब मोरे आणि कोल्हापूरच्या कणेरी येथील सिद्धगिरी मठाचे मठाधिपती काडसिद्धेश्वर स्वामी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या सोहळय़ास मंत्री उदय सामंत आणि रवींद्र चव्हाण हेदेखील उपस्थित राहणार असून त्यांचाही या वेळी सत्कार करण्यात येईल.

या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे यांची प्रकट मुलाखत, गौरवग्रंथाचे प्रकाशन, गौरवगीताचे सादरीकरण होणार आहे. तसेच याबकार्यक्रमापूर्वी शिंदे यांच्या नितीन कंपनी येथील निवासस्थानापासून कार्यक्रमस्थळापर्यंत त्यांच्या मिरवणुकीचेही आयोजन करण्यात आले आहे. शिंदे यांचे निवासस्थान- नितीन जंक्शन – सर्व्हिस रोडने कॅडबरी जंक्शन – वर्तक नगर – शास्त्री नगर – पोखरण १ व २ – बेथनी हॉस्पिटल – आंबेडकर चौक – घाणेकर नाट्यगृह असा मिरवणुकीचा मार्ग असणार आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
कल्याण : मेल एक्सप्रेसमध्ये महिलांच्या पैशाच्या पिशव्या चोरणारा सराईत चोरटा अटक ; कल्याणमधील १३ चोऱ्या उघड
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी