घरासमोर पान, तंबाखू खाऊन थुंकू नकोस, कचरा टाकू नकोस असे शेजाऱ्याला सोसायटीतील दोन रहिवाशांनी सांगितले. त्याचा राग येऊन घरा समोर घाण करणाऱ्या रहिवाशाने समज देणाऱ्या रहिवाशाच्या डोक्यात पेव्हर ब्लाॅकचा तुकडा मारुन गंभीर जखमी केले.घरासमोर घाण करुन उलट दहशतीचा अवलंब करणाऱ्या रहिवाशावर पालिकेने कारवाई करण्याची मागणी इतर रहिवाशांनी केली आहे. रमेश गुप्ता (रा. अनुपनगर, ए-३, इमारत, पहिला माळा, मुरबाड रस्ता, कल्याण पश्चिम) असे आरोपीचे नाव आहे. राकेश गुरचल (३५) असे तक्रारदार रहिवाशाचे नाव आहे. गुरुचल यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>वर्षभरात कल्याण रेल्वे स्थानका जवळील २५ हजार रिक्षा चालकांवर कारवाई,एक कोटी ७० लाखाचा दंड वसूल

पोलिसांनी सांगितले, तक्रारदार राकेश गुरचल, त्यांचे वडील सुरेश हे अनुपनगर सोसायटीत राहतात. याच सोसायटीत आरोपी रमेश गुप्ता राहतो. रमेश हा राहत्या घरासमोर तंबाखू खाऊन थुंकणे, कचरा टाकणे, खराब पाणी टाकत असल्याने सोसायटीत घाण होते. इतर रहिवाशांना त्याचा त्रास होतो म्हणून मुलगा राकेश, वडील सुरेश गुरचल हे रमेश यांना घरासमोर घाण करू नकोस म्हणून बुधवारी दुपारी सांगण्यासाठी गेले. रमेशने दोघांचे काहीही ऐकुन न घेता तुम्ही मला सांगणारे कोण असा प्रश्न केला. आपणास गुरचल वडील, मुलाने येऊन हटकले त्याचा राग रमेशला आला.

हेही वाचा >>>सुदृढ आरोग्याचा संदेश देत सायकल स्वारांची कल्याण-गुजरात मोहीम,तीन दिवसात ४२० किमी अंतर पार

त्यानंतर राकेश हे आपल्या कामासाठी घराबाहेर पडले. मुरबाड रस्त्याने जात असताना रमेश गुप्ताला राकेश दिसला. राकेश घराच्या दारात येऊन गेल्याचा राग रमेशच्या मनात होता. रमेशने वाटत पडलेला पेव्हर ब्लाॅकचा तुकडा उचलून तो राकेश गुरचलच्या डोक्यात मारला. भर रस्त्यात हा प्रकार घडला. डोक्याला इजा झाल्याने राकेश महात्मा फुले पोलीस ठाण्यात गेला. पोलिसांनी राकेशच्या तक्रारीवरुन रमेश गुप्तावर गु्न्हा दाखल केला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A resident of kalyan was beaten up amy
First published on: 08-12-2022 at 16:51 IST