कल्याण पश्चिमेतील रामबाग गल्लीत एका बुलेट चालक आणि त्याच्या साथीदाराने एका विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली. बुलेट चालकांनी ठोशाबुक्क्यांनी मारहाण केल्याने विद्यार्थ्याचे नाक, हाताचे हाड मोडले आहे. बुधवारी संध्याकाळी ही घटना घडली आहे.विदयार्थ्याच्या चेहऱ्यावर मारहाणीच्या गंभीर जखमा झाल्या आहेत. अविनाश चिंधू पाटील (रा. कणकावती सोसायटी, रामबाग गल्ली क्र. ४ येथे तो राहतो. बुलेटवरील (एमएच-०५-२३०३) दोन अज्ञात जणांच्या विरुध्द अविनाशने महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन बुलेट चालकाचा तपास सुरू केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>ठाणे: दारु पिण्यावरुन कारणावरून एकाची हत्या

पोलिसांनी सांगितले, अविनाश पाटील हा त्याचा मित्र धनंजय ठाकरे यांच्या बरोबर दुचाकीवरुन रामबाग गल्ली मधून एका औषध दुकानातून घरी चालले होते. साॅल्टी हाॅटेल गुरुद्वारा येथून जात असताना अविनाशच्या दुचाकीच्या समोरुन एक बुलेट चालक आणि त्याचा मित्र संथगतीने चालले होते.अविनाशने आपल्या दुचाकीचा भोंगा वाजवून बुलेट चालकाला गतीने पुढे जाण्यास किंवा स्वताला पुढे जाण्यासाठी रस्ता देण्याची मागणी केली.आपणास भोंगा वाजवून इशारा का दिला याचा राग बुलेट चालकाला आला. त्याने भर रस्त्यात बुलेट थांबवून अविनाशला तु मला भोंगा का वाजविलास असा प्रश्न विचारला. तुम्ही संथगतीने चालला आहात मला घाई असल्याने रस्ता द्या अशी मागणी तुमच्याकडे केली, असे अविनाशने बुलेट स्वाराला सांगितले. संतप्त झालेल्या बुलेट चालक आणि त्याच्या साथीदाराने अविनाशला ठोशा बुक्क्याने बेदम मारहाण केली. चेहऱ्यावर ठोशाबुक्क्याची मारहाण झाल्याने अविनाशचे नाकाचे हाड तुटले. मनगट पिरगळल्याने तेथील हाड मोडले आहे.

हेही वाचा >>>कल्याण: नागरी समस्यांवरुन कल्याण डोंबिवली पालिकेसमोर जागरुक नागरिकांची धरणे आंदोलने

गंभीर जखमी झालेल्या अविनाशने महात्मा फुले पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली.गेल्या आठवड्यात एका बुलेट चालकाने भरधाव वेगात बुलेट चालवून आजोबा-नातवाला ठाकुर्ली ९० फुटी रस्त्यावर ठोकर दिली होती. कल्याण, डोंबिवलीत बुलेट चालकांचा बेदरकरपणा वाढला असल्याने त्यांच्या वाहतूक विभाग, आरटीओ विभागाने कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.बहुतांशी बुलेट चालक हे भूमाफिया असल्याची माहिती एका जाणकाराने दिली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A resident of kalyan was beaten up for telling her not to pollute in front of her house amy
First published on: 09-12-2022 at 17:16 IST